esakal | शेतीची ओढ बसू देत नव्हती, मग नोकरी सोडून गाठले गाव
sakal

बोलून बातमी शोधा

साईनाथ चौधरी, सूरज राऊत या तरुण उच्चशिक्षित शेतकऱ्यांनी शेतीपासून दूर जाणाऱ्यांपुढे आदर्श निर्माण केला आहे.

आधी कर सल्लागार म्हणून पूर्णवेळ व्यवसाय पाहत होतो आणि अर्धवेळ शेती करायचो. आता पूर्णवेळ शेती आणि अर्धवेळ व्यवसाय करत आहे.

शेतीची ओढ बसू देत नव्हती, मग नोकरी सोडून गाठले गाव

sakal_logo
By
मधुकर कांबळे

औरंगाबाद : उत्तम शेती, मध्यम व्यापार आणि कनिष्ठ नोकरी असे मानले जायचे. पण कालांतराने यात बदल झाला तरी आजही अनेकांना आता शेतीचे महत्त्व पटू लागले आहे. बी. ई. मेकॅनिकलचे शिक्षण, एका खासगी कंपनीत चांगली नोकरी असतानाही त्यांना शेतीची ओढ बसू देत नव्हती. म्हणून गावी जाऊन त्यांनी शेतीत Agriculture पूर्ण लक्ष घातले आणि वीस गुंठ्यातील गुलाबाच्या फुलशेतीतून Floriculture महिन्याला लाख रुपयांचे उत्पन्न घेत साईनाथ चौधरी, सूरज राऊत या तरुण उच्चशिक्षित शेतकऱ्यांनी शेतीपासून दूर जाणाऱ्यांपुढे आदर्श निर्माण केला आहे. पंचतारांकित शेंद्रा एमआयडीसीपासून १५-२० किलोमीटरवर असलेल्या दुधड येथील साईनाथ चौधरी हे बी. ई. मेकॅनिकलचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर शेंद्रा एमआयडीसीतील Shendra MIDC एका कंपनीत नोकरीला होते, मात्र त्यांचे मन नोकरीत रमले नाहीत. त्यांनी नोकरीचा राजीनामा दिला आणि घरच्या शेतीत पॉलिहाऊसमध्ये गुलाबशेती सुरू केली. तर दुसरे सूरज राऊत कर सल्लागार म्हणून औरंगाबादमध्ये Aurangabad स्वत:फर्म चालवतात. कोरोना काळात गावाकडे गेल्यानंतर राऊत यांचेही मन रमले आहे. दोघेही समन्वयाने आपापली फुलशेती फुलवत आहेत. श्री. चौधरी म्हणाले, की तीन वर्षांपासून पॉलिहाऊसमध्ये गुलाबाची शेती करतो. तळेगाव दाभाडे येथून १२ रुपयाला एक याप्रमाणे रोपे लावली आहेत. अर्ध्या एकरात जवळपास २० लाखांचा खर्च येतो तर ६० टक्के अनुदान मिळते. अर्ध्या एकरात १५-१६ हजार रोपांची लागवड केली आहे. गुलाबशेतीतून ३६५ दिवस काढणी होते. लागवडीनंतर तीन महिन्यांनी विक्रीयोग्य फुलांचे पीक येते. पॉलाहाऊसमधून फुले तोडून, पॅकिंग करून जवळच्याच जालना रोड येथून मुंबई Mumbai, नागपूर Nagpur आणि हैदराबाद Hyderabad येथील बाजारपेठेत पाठवतो. दुसऱ्या दिवशी आदल्या दिवशीच्या भावानुसार फुलांची पट्टी फाडून येते आणि रक्कम मिळते.Two Engineers Resigned From Jobs, Join Farming

हेही वाचा: कॉम्प्युटर ॲप्लिकेशनचे ‘ते’ विद्यार्थी नापासच! निकालात गोंधळ

फुलांचा कितीही भाव पडला तरी तीन रुपयांना एक फुल विकले जाते. रोज अर्ध्या एकरात (२० गुंठे) १२०० ते १५०० फुले येतात याप्रमाणे दररोज साडेतीन ते साडेचार हजार रुपये मिळतात. यातून मजुरी आणि खते असा दीड हजारापर्यंत रोज खर्च होतो, उर्वरित रक्कम ही पूर्णपणे नफा असतो. म्हणजेच महिन्याला अर्ध्या एकरातील फुलशेतीमधून एक ते सव्वा लाखांचे उत्पन्न हाती मिळते.सूरज राऊत म्हणाले, की वडील भागीनाथ राऊत हे नोकरी करत असल्याने मी औरंगाबादमध्येच राहत होतो. वडील दर आठवड्याला शनिवार, रविवार गावी येऊन शेती करायचे. मात्र कोरोनाकाळात मी गावी आलो आणि शेतीत लक्ष घातले. एवढेच नाही तर शेतीत रमलोदेखील. आधी कर सल्लागार म्हणून पूर्णवेळ व्यवसाय पाहत होतो आणि अर्धवेळ शेती करायचो. आता पूर्णवेळ शेती आणि अर्धवेळ व्यवसाय करत आहे. पारंपरिक शेतीला फुलशेतीची जोड दिली पाहिजे तर शेती फायदेशीर होईल, असे मतही त्यांनी व्यक्त केले.

loading image