

Tragic Death Raises Questions on Marital Dispute
Esakal
छत्रपती संभाजीनगरमध्ये काजल लघाणे या विवाहितेनं गळफास घेत आत्महत्या केल्याच्या घटनेनं खळबळ उडालीय. एक एप्रिल रोजी सकाळी सात वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. विवाहितेच्या माहेरच्या नातेवाईकांनी या प्रकरणी पतीसह सासरच्या मंडळींवर गंभीर आरोप केले आहेत. पतीचे अनैतिक संबंध, कौटुंबिक छळ आणि मानसिक त्रासाला कंटाळून तिने टोकाचं पाऊल उचलल्याचा आरोप कुटुंबियांनी केलाय.