Workplace Accident: संसाराला हातभार लावणारे हातच गेले; मशीनमध्ये अडकून २० वर्षीय तरुणी अधू
Press Machine Accident: वाळूजमधील एका कंपनीत काम करणाऱ्या २० वर्षीय मुन्नुबाई अजय बेसराच्या दोन्ही हात मशीनमध्ये अडकून कापावे लागले. आता तिचा पोट भरण्यासाठी देखील त्रास होतो आहे.
बजाजनगर : तिचं वय अवघं २० वर्ष. संसाराला हातभार लावावा, यासाठी तिने काम करण्याचे ठरवले. वाळूज येथील एच सेक्टरमधील एका कंपनीत १६ ऑगस्टला ती कामालाही लागली. अकुशल असतानाही संबंधित कंपनीने तिला ‘प्रेस शॉप’चे काम दिले.