Sambhaji Nagar : मराठा समाजाच्या सर्वेक्षणासाठी तज्ज्ञ प्रशिक्षकांचे आज प्रशिक्षण ; तीन हजार कर्मचारी प्रगणकांचीही नेमणूक

राज्यातील मराठा समाजाच्या सर्वेक्षणाला प्रत्यक्षात मंगळवार (ता. २३) पासून सुरुवात केली जाणार आहे. त्यासाठी गोखले इन्स्ट्यूट्युते तज्ञ शनिवारी (ता. वीस) शहरात दाखल होणार आहेत. संस्थेकडून प्रशिक्षकांना सॉफ्टवेअर हाताळण्याचे प्रशिक्षण दिले जाणार आहे.
maratha reservation
maratha reservationesakal

छत्रपती संभाजीनगर : राज्यातील मराठा समाजाच्या सर्वेक्षणाला प्रत्यक्षात मंगळवार (ता. २३) पासून सुरुवात केली जाणार आहे. त्यासाठी गोखले इन्स्ट्यूट्युते तज्ञ शनिवारी (ता. वीस) शहरात दाखल होणार आहेत. संस्थेकडून प्रशिक्षकांना सॉफ्टवेअर हाताळण्याचे प्रशिक्षण दिले जाणार आहे.

यासाठी विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार निवासी उपजिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी, तहसिलदार, नायब तहसिलदार हे तज्ज्ञ प्रशिक्षक म्हणून नेमण्यात आले आहेत. त्यांच्या अधिपत्त्याखाली जिल्हाधिकारी, महापालिकेतील कर्मचारी प्रगणक म्हणून काम पाहणार आहेत.

पुण्यातील संस्थेचे प्रशिक्षक सॉफ्टवेअर हाताळण्याचे प्रशिक्षण देणार आहेत. या सॉफ्टवेअरमधे सुमारे १६१ प्रश्न आहेत. या सर्व प्रश्नांची उत्तरे मराठा कुटुंबियांकडून भरुन घेतली जाणार आहे. ग्रामीण भागातील सर्वेक्षणासाठी तलाठी, कोतवाल, पोलिस पाटील यांची मदत घेतली जाणार आहे. त्यासाठी तहसिलदार, नायब तहसिलदार यांची नोडल अधिकारी व सहायक नोडल अधिकारी म्हणून नेमणूक करण्यात आली आहे.

सर्वेक्षणासाठी शिक्षक, तलाठी, मंडळ अधिकारी, कृषिसेवक आणि ग्रामसेवक यांना प्रगणक म्हणून नेमण्यात आले आहे. त्यांना तज्ज्ञ प्रशिक्षक प्रशिक्षण देणार आहेत. तर तहसिलदार आणि नायब तहसिलदार हे नोडल अधिकारी म्हणून काम पाहणार आहेत.

maratha reservation
Sambhaji Nagar : मराठ्यांना ओबीसीतूनच आरक्षण मिळावे ; खेडेकर

त्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालया अंतर्गत तीन हजार ७०० कर्मचारी नेमण्यात आले आहेत. ३०० कुटुंबामागे एक प्रगणक, ३०० ते ६०० कुटुंबामागे २ प्रगणक तसेच ६०० कुटुंबाच्या पुढे तीन प्रगणक नेमण्यात आले आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com