Truck Driver : निम्मे आयुष्य रस्त्यावर गेले; बाकीचे जेलमध्ये घालणार का?

अपघातग्रस्ताला जागेवर सोडून गेल्यास वाहनचालकाला दहा वर्षे शिक्षा आणि दहा लाख रुपयांचा दंड करण्याच्या केंद्र शासनाच्या विधेयकाच्या विरोधात वाहनचालकांनी संताप व्यक्त केला आहे.
Truck Driver Strike
Truck Driver Strikesakal

छत्रपती संभाजीनगर - अपघातग्रस्ताला जागेवर सोडून गेल्यास वाहनचालकाला दहा वर्षे शिक्षा आणि दहा लाख रुपयांचा दंड करण्याच्या केंद्र शासनाच्या विधेयकाच्या विरोधात वाहनचालकांनी संताप व्यक्त केला आहे. अर्धे आयुष्य रस्त्यावर गेले आता उर्वरित आयुष्य जेलमध्ये घालावे का, असा संतप्त सवाल वाहनचालकांनी केला आहे.

केंद्र सरकारने अपघातग्रस्त वाहनचालकाच्या विरोधात नवीन कायदा लागू करण्याचे ठरवले आहे. अपघातग्रस्ताला रुग्णालयात किंवा पोलिस ठाण्यात नेणे बंधनकारक आहे. अपघातग्रस्ताला जागेवर सोडून पळ काढला तर हीट ॲण्ड रन म्हणून चालकाला तब्बल दहा वर्षांच्या शिक्षेसह दहा लाख रुपयांच्या दंडाची शिक्षा जाहीर केली. या निर्णयामुळे चालकांमध्ये संतापाची लाट निर्माण झाली आहे.

काय म्हणतात चालक

मारहाणीबद्दलही कायदा व्हावा

वाहनचालक अपघात व्हावा म्हणून वाहन चालवत नाही. अपघाताला विविध कारणे असतात. त्यामुळे चालकाला दोषी धरून दिलेली शिक्षा ही गंभीर बाब आहे. घटनास्थळी चालकाला होणाऱ्या मारहाणीबद्दलही कायदा केला पाहिजे.

- फेरोज पटेल, कंटेनर चालक

सरकारचा निषेध करणार

केंद्र सरकारने जो कायदा पारित केला, त्याच्याविरोधात महाराष्ट्र वाहतूक सेनेच्या माध्यमातून मंगळवारी (ता. ३) सर्व वाहने बंद करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. चौकाचौकांमध्ये टायर जाळून निषेध व्यक्त करण्यात येणार आहे.

- सलीम खामगावकर, जिल्हाध्यक्ष, महाराष्ट्र वाहतूक सेना

शेती करावी लागणार

केंद्र शासनाने आणलेला नवीन कायदा हा वाहनचालकांसाठी त्रासदायक आहे. मुळात कुठलाही चालक मुद्दाम अपघात करू शकत नाही. अपघात हा अपघातच असतो. त्याला अशी गंभीर शिक्षा ठेवली, तर वाहन परवाना फाडून घरी शेती करावी लागणार आहे.

- राम दिवेकर, ट्रकचालक

चालकाला होते मारहाण

वाहनचालकाला अपघात झाल्यानंतर बेदम मारहाण केली जाते. जिवाच्या भीतीने चालक घटनास्थळावरून जवळचे पोलिस ठाणे गाठतो. चालकाने आयुष्यभर काम केल्यानंतरही दहा लाख भरता येणे शक्य नाही. यापुढे मोलमजुरी करावी लागणार आहे.

- रफिक रशीद शेख, कंटेनरचालक

अर्धे आयुष्य रस्त्यावर

वाहन चालविताना अर्धे आयुष्य हे रस्त्यावर गेले आहे. आता उर्वरित आयुष्य जेलमध्ये घालण्याची वेळ येणार असेल तर वाहन सोडून इतर नोकरी करावी लागणार आहे. दहा लाख असते तर वाहन चालविण्याऐवजी कुठलातरी व्यवसाय केला असता.

- रईस दस्तगीर शेख, आयशरचालक

निर्णय मागे घ्यावा

अपघात झाल्यानंतर चालकाला जागेवर मारहाण होते, त्यांना काहीही शिक्षा नाही. मात्र, चालकाकडून अपघात झाल्यानंतर अशा प्रकारे जबर शिक्षा देणे हे योग्य नाही. शासनाने तातडीने हा निर्णय मागे घेतला पाहिजे.

- सिद्धेश्वर केंढरे, वाहनचालक

ट्रक उभा करून ठेवला

चालकाला दिवसरात्र रस्त्यावर वाहन चालवावे लागते. अपघाताला अनेक कारणे असतात. कुणीही मुद्दाम अपघात करत नाही. मी ट्रक घेऊन कर्नाटकात निघालो होतो. मात्र, केंद्र सरकारने आणलेल्या कायद्यामुळे ट्रक उभा करून ठेवला आहे. हा निर्णय रद्द करण्याची गरज आहे.

- अजिम शेख, ट्रकचालक

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com