FDA Crime : तुकाराम मुंढेंचा सर्वात मोठा दणका! संभाजीनगर शॉक; प्रसिद्ध 'आईच्या गावात' अन् 'यल्ला यल्ला' हॉटेलला टाळे

काही दिवसांपूर्वीच एफडीएने शहरातील १८५ अन्न व्यावसायिकांची बैठक घेऊन नव्या अन्न सुरक्षा नियमांची माहिती दिली होती. कारवाईचा इशाराही दिला होता. मात्र....
FDA Crime on Hotel aaichya gavat and hotel yalla yalla

FDA Crime on Hotel aaichya gavat and hotel yalla yalla

sakal

Updated on

छत्रपती संभाजीनगर - बटर चिकन, पनीर, हरियाली कबाब, चिकन लॉलीपॉपसह विविध पदार्थामध्ये सिंथेटिक फूड कलरचा वापर, स्वयंपाकघरात बुरशी लागलेल्या भाज्या, शाकाहारी-मांसाहारी पदार्थाची एकत्र साठवणूक आणि अस्वच्छतेचा कळस, तर दुसरीकडे बटर नानच्या नावाखाली व्हेजिटेबल फॅट स्प्रेड वापरून ग्राहकांची फसवणूक केल्यामुळे शहरातील दोन रेस्टॉरंटमध्ये नागरिकांच्या आरोग्याशी सुरू असलेला हा खेळ अन्न व औषध प्रशासनाच्या (एफडीए) मध्यरात्रीच्या धडक कारवाईत उघड झाला. यातील 'यल्ला यल्ला' रेस्टॉरंट आणि 'आईच्या गावात फेमस टेन रेस्टॉरंटवरील कारवाईनंतर दोन्ही आस्थापनांचे परवाने पुढील आदेशापर्यंत निलंबित केले आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com