esakal | CoronaVirus : धक्के सुरूच औरंगाबादेत विसावा बळी
sakal

बोलून बातमी शोधा

CoronaVIrus

औरंगाबाद शहरात दोन दिवसात चार कोरोना बाधितांचा मृत्यू झाला असतानाच आज (ता.१४) पहाटे पाच वाजून २० मिनिटांनी हुसेन कॉलनीतील ५५ वर्षीय महिलेचा कोरोना व इतर आजाराने मृत्यू झाला. शहरातील मृतांचा आकडाही चिंताजनक असून तो २० वर पोचला आहे. तर कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ७४३ झाली आहे.

CoronaVirus : धक्के सुरूच औरंगाबादेत विसावा बळी

sakal_logo
By
मनोज साखरे

औरंगाबाद : औरंगाबाद शहरात दोन दिवसात चार कोरोना बाधितांचा मृत्यू झाला असतानाच आज (ता.१४) पहाटे पाच वाजून २० मिनिटांनी हुसेन कॉलनीतील ५५ वर्षीय महिलेचा कोरोना व इतर आजाराने मृत्यू झाला. शहरातील मृतांचा आकडाही चिंताजनक असून तो २० वर पोचला आहे. तर कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ७४३ झाली आहे.

हेही वाचा-  शेतकऱ्यांनो सावधान!!! तीन दिवस आहे जोरदार वादळी वारा

मृत महिला गारखेडा,  हुसेनकॉलनी येथे राहत होती. बारा मे रोजी अकराच्या सुमारास एका खासगी रुग्णालयातून त्यांना घाटी रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात भरती करण्यात आले होते. त्यांना पूर्वीपासून मधुमेह, उच्चरक्तदाब व हायपोथॉयरॉडिसमचा त्रास होता. १२ मे रोजी त्यांचा कोरोना चाचणी अहवाल  पॉझिटिव आला होता. अतिदक्षता विभागात कोविड-१९ आजाराचे त्यांच्यावर उपचार सुरू होते. आज १४ मे रोजी पहाटे पाच वाजून वीस मिनिटांनी त्यांचा न्यूमोनिया विथ एआरडीएस ड्युटू कोविड -१९ सोबतच तसेच उच्चरक्तदाब, मधुमेह मेलिटिस आणि हायपोथायरॉईडीसम या आजाराने मृत्यू झाला.

हे वाचलंत? का बीड हादरले : पारधी कुटुंबातील तिघांची हत्या, पुरोगामी महाराष्ट्राला काळिमा

कोरोना मिटर
उपचार घेणारे रुग्ण - ५१३
बरे झालेले रुग्ण - २१०
एकूण मृत्यू      - २०
एकूण रुग्णसंख्या - ७४३

१२ आणि १३ मे रोजी झालेले चार मृत्यू

गारखेडा परिसरातल्या हुसैन कॉलनी येथील ५८ वर्षीय महिलेला मंगळवारी (ता. १२)  घाटी रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. दुपारी बाराच्या सुमारास उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला. मृत्यूनंतर बुधवारी (ता. १३) त्यांचा पॉझिटिव्ह रिपोर्ट आला आहे. त्यांच्या मृत्यूचे कारण बायोलटरल न्यूमोनायटिस ड्यु टू कोविड -१९ इन केस ऑफ डायबेटीस मलायटिस विथ हायपोथायरॉईडीझम आहे.
औरंगाबादच्या इतर बातम्या वाचण्यासाठी - क्लिक करा

बीड बायपास रोडवरील अरुणोदय कॉलनी येथील ९४ वर्षीय महिलेचा घाटीत (ता. १२) सांयकाळी पाचच्या सुमारास उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यांच्या मृत्यूचे कारण बायोलटरल न्यूमोनायटिस विथ रेस्पारेटरी फेल्युअर विथ कोविड -१९ हे कारण आहे. सिल्क मिल कॉलनी येथील ६५ वर्षी एक कोरोना बाधित महिलेला घाटी रुग्णालयामध्ये १२ मे रोजी भरती करण्यात आले होते. १३ मे रोजी पहाटे चार वाजता या महिलेचा मृत्यू झाला.

मराठवाड्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी - क्लिक करा

त्यांच्या मृत्यूचे कारण बायोलटरल न्यूमोनायटिस ड्यु टू कोविड -१९ केस ऑफ डायबेटीस मेलीटीस विथ हायपर टेन्शन विथ इसकेमिस हार्ट डीसीज आहे. रहेमानिया कॉलनी येथील ५९ वर्षीय पुरुषाचा कोरोनामुळे १३ मे रोजी पहाटे साडेसहाच्या सुमारास मृत्यू झाला.

या रुग्णाला खासगी रुग्णालयात १३ मे रोजी पहाटे दाखल करण्यात आले होते. त्यांचा न्यूमोनिया आणि कोविड -१९ मुळे मृत्यू झाला. त्यांना आधीपासून मधुमेह आणि उच्च रक्तदाब होता. त्यांना दिन दिवसांपासून ताप, खोकला आणि श्वास घेण्यास त्रास होता. अशी माहिती खासगी रुग्णालयातील डॉक्टरांनी दिली.

महाराष्ट्रातील इतर बातम्या बाचण्यासाठी - क्लिक करा

loading image