
औरंगाबादच्या कन्नड तालुक्यातील एका ग्रामपंचायतीचा हटके निकाल हाती आलाय.
Gram Panchayat Result : निवडणुकीत सख्या मावस भावांच्या बायका, मतंही पडली समसमान; शेवटी 'असा' दिला निकाल
Aurangabad Gram Panchayat Election Results : राज्यात गेल्या रविवारी पार पडलेल्या 7135 ग्रामपंचायत निवडणुकीचा निकाल आज लागला आहे. निवडणुकीत अनेक दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. काही जिल्ह्यात बिनविरोध निवड झाली. तर काही ठिकाणी प्रत्यक्ष मतदान प्रक्रिया पार पडली होती. आता त्याचे सर्व निकाल हाती येत आहेत.
औरंगाबादच्या कन्नड तालुक्यातील (Kannada Taluka) एका ग्रामपंचायतीचा असाच काही हटके निकाल हाती आलाय. सख्या मावस भावांच्या बायका ग्रामपंचायत निवडणुकीच्या रिंगणात होत्या. मात्र, मतमोजणी सुरु असतानाच दोन्ही उमेदवारांना समान मत मिळाल्यामुळं ईश्वर चिठ्ठी काढावी लागली. त्यानंतर एकीचा विजय तर दुसरीचा पराभव झाला आहे. कन्नड तालुक्यातील गराडा ग्रामपंचायत निवडणुकीत दोन सख्या मावस भावांच्या अर्धांगणी निवडणुकीत आमने-सामने होत्या.
पूजा सचिन राठोड या उद्धव बाळासाहेब ठाकरे गट तर रेश्मा राहुल राठोड एकनाथ या शिंदे गटाकडून रिंगणात होत्या. दोन्ही गटाकडून जोरदार प्रचार करण्यात आला होता. दरम्यान आज मतमोजणी वेळी दोघींना 540 मतदान झाल्यामुळं चिठ्ठी काढण्यात आली. यात पूजा सचिन राठोड यांचा विजय झालाय.