
छत्रपती संभाजीनगर : दोन पराभूत उमेदवारांनी मतदान यंत्र पडताळणी करण्याच्या मागणीसाठी जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांकडे अर्ज केले आहेत. यामध्ये कन्नड मतदारसंघातील अपक्ष उमेदवार हर्षवर्धन जाधव आणि औरंगाबाद पश्चिम मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार राजू शिंदे यांचा समावेश आहे. उपजिल्हा निवडणूक अधिकारी देवेंद्र कटके यांनी ही माहिती दिली.