esakal | सिल्लोड तालुक्यातील पळशीत दोन गटांत तुंबळ हाणामारी, ग्रामपंचायत निवडणुकीच्या रागातून भांडण
sakal

बोलून बातमी शोधा

Sillod News

सकाळच्या सुमारास गावातील दोन गटांत कुरबुर होऊन धक्काबुक्कीचा प्रकार घडला. त्याचे पर्यवसान तुंबळ हाणामारीत झाले.

सिल्लोड तालुक्यातील पळशीत दोन गटांत तुंबळ हाणामारी, ग्रामपंचायत निवडणुकीच्या रागातून भांडण

sakal_logo
By
सचिन चोबे

सिल्लोड (जि.औरंगाबाद) : दोन दिवसांपूर्वी झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीनंतर रविवारी (ता.१७) पळशी (ता.सिल्लोड) येथे सकाळी दोन गटांत तुंबळ हाणामारीचा प्रकार घडला आहे. घटनेननंतर गावात भयावह शांतता पसरली होती. सकाळच्या सुमारास गावातील दोन गटांत कुरबुर होऊन धक्काबुक्कीचा प्रकार घडला. त्याचे पर्यवसान तुंबळ हाणामारीत झाले. नेमका प्रकार समोर आला नसून, ग्रामपंचायत निवडणुकीच्या रागाची किनार भांडणास असल्याचे बोलले जात आहे.

घटनेनंतर पळशी गावात राज्य राखीव दलाची (एसआरएफ) तुकडी, सिल्लोड ग्रामीणचे पोलीस ठाण्याचे पोलिस कर्मचारी दाखल झाले होते. प्रभारी उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ.विशाल नेहुल, ग्रामीण पोलीस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक किरण बिडवे यांनी गावात भेट देऊन शांतता राखण्याचे आवाहन केले आहे.

संपादन - गणेश पिटेकर

loading image