esakal | समोरा-समोर दुचाकी धडकून झालेल्या अपघातात दोघे गंभीर जखमी
sakal

बोलून बातमी शोधा

Two persons were seriously injured in a two-wheeler collision in front of a petrol pump near Murma Fateh on Aurangabad-Solapur National Highway. 2.jpg

ही घटना औरंगाबाद-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील मुरमा (ता.पैठण) फाट्याजवळील पेट्रोल पंपासमोर शुक्रवारी (ता.२५) सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास घडली.

समोरा-समोर दुचाकी धडकून झालेल्या अपघातात दोघे गंभीर जखमी

sakal_logo
By
हबीबखान पठाण

पाचोड (औरंगाबाद) : शेतातून दिवसभराचे काम आटोपून कापसाचे गाठोडे घेऊन घराकडे परतत असताना दोन दुचाकीचा वळण घेताना समोरा-समोर अपघात होऊन दोघे जण गंभीर जखमी झाले आहे. ही घटना औरंगाबाद-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील मुरमा (ता.पैठण) फाट्याजवळील पेट्रोल पंपासमोर शुक्रवारी (ता.२५) सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास घडली.

हे ही वाचा : मोटार सायकलची बैलगाडीला धडक, युवक ठार

अधिक माहिती अशी, डोणगाव (ता.अंबड) येथील शेतकरी आजिनाथ भास्कर जायभाये हे दुचाकी (क्र.एम.एच.२०.इ.डब्लू.१८०४) वरून काम आटोपून दिवस भर वेचलेल्या कापसाचे गाठोडे घेऊन दुचाकीने गावाकडे जाताना महामार्गावरील मुरमा फाटयाजवळील अनुसया पेट्रोल पंपासमोरून अचानक वळण घेताना दुचाकीस (क्रमांक एम.एच.२१.बी.एल.४६८७) ही दुचाकी वळण घेताना यात धडक झाली. यात आजिनाथ भास्कर जायभाये (वय ३५ वर्ष), विष्णू साहेबराव पवार (वय ५० वर्ष) दोघे रा.डोणगाव तांडा (ता.अंबड) या दोघांच्याही डोक्याला व पायाला गंभीर मार लागून ते जखमी झाले.

औरंगाबादच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा  

हा अपघात घडताच स्थानिक नागरिकांसह रस्त्याने जाणाऱ्या नागरिकांनी मदतकार्य केले. त्यानंतर पाचोड येथील टोलनाक्यावरील रुग्णवाहिकेला बोलविले. ही माहिती मिळताच तातडीने ही रुग्णवाहिका घटनास्थळी पोहचली. उपस्थितानी जखमीला या रुग्णवाहिकेद्वारे पाचोड येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले. वैद्यकिय अधिकारी डॉ. रामेश्वर घुगे यांनी प्रथमोपचार करून त्यांना औरंगाबादला पाठविले. काही वेळ अपघातामुळे वाहतूक खोळंबून वाहनांच्या दुतर्फा रांगा लागल्या होत्या. ही माहीती मिळताच पाचोड पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक अतूल येरमे, कर्मचारी विलास काकडे, हनूमान धनवे, भगवान धांडे, जगन्नाथ उबाळे आदी पोलिस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन वाहतूक सुरळीत केली.
 
या घटनेची पाचोड पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली असून पुढील तपास पाचोड पोलिस करत आहे.

loading image