मोटार सायकलची बैलगाडीला धडक, युवक ठार

कमलेश  जब्रास
Saturday, 26 December 2020

तालुक्यातील शुक्लतिर्थ लिमगाव येथील अमोल काबुराव हांडे (वय २७) हे आपले काम आटोपून माजलगाव कडून शुक्लतिर्थ लिमगावकडे मोटार सायकलने जात होते. या दरम्यान माजलगाव ते परभणी या रस्त्यावर दुगड पंपा नजिक उस वाहतूक करणाऱ्या बैल गाडीला धडक झाल्याने अपघात झाला.

माजलगाव  (बीड) : माजलगाव ते परभणी रस्त्यावर दुगड पंपा नजिक ऊस वाहतूक करणाऱ्या बैलगाडीला पाठीमागून मोटार सायकल धडकल्याने शुक्लतिर्थ लिमगाव येथील युवक ठार झाल्याची घटना शुक्रवारी (ता. 25) रात्री ७.३० च्या दरम्यान घडली.

तालुक्यातील शुक्लतिर्थ लिमगाव येथील अमोल काबुराव हांडे (वय २७) हे आपले काम आटोपून माजलगाव कडून शुक्लतिर्थ लिमगावकडे मोटार सायकलने जात होते. या दरम्यान माजलगाव ते परभणी या रस्त्यावर दुगड पंपा नजिक उस वाहतूक करणाऱ्या बैल गाडीला धडक झाल्याने अपघात झाला.

हे ही वाचा : आजोबा तुमच्या जिद्दीला सलाम; नातवाला शिकवण्यासाठी कॅलेंडरविक्रीतून स्वप्नाकडे प्रवास

यामध्ये अमोल हांडे हे जागीच ठार झाल्याची घटना शुक्रवारी रात्री ७.३० वाजता घडली. दरम्यान अपघातस्थळी माजलगाव ग्रामीण ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक सोमनाथ नरके यांच्यासह कर्मचाऱ्यांनी धाव घेतली. मयत हांडे यास शवविच्छेदनासाठी माजलगाव ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले आहे.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: A youth was killed when a motorcycle hit a bullock cart on Majalgaon to Parbhani road