esakal | समोरुन येणाऱ्या मोटारसायकलला ट्रकची धडक, एक जण जागीच ठार
sakal

बोलून बातमी शोधा

accident

अपघात हा औरंगाबाद ते कन्नड महामार्गाचे काम चालू असून एकेरी वाहतूक चालू असल्याने  अज्ञात वाहनाने मोटरसायकलला समोरून धडक दिल्याने  झाला.

समोरुन येणाऱ्या मोटारसायकलला ट्रकची धडक, एक जण जागीच ठार

sakal_logo
By
बाबासाहेब दांडगे

गल्लेबोरगाव (जि.औरंगाबाद) : औरंगाबाद-धुळे राष्ट्रीय महामार्गावर  पळसवाडी शिवारात गुरुवारी (ता.२१)  ट्रक व मोटारसायकलचा समोरासमोर धडक झाल्याने एक जण जागीच ठार झाला. एक जण गंभीर जखमी झाला. मोटरसायकलवर (एमएच१७ बीपी ३५१९) भगवान कुशीनाथ गायकवाड (वय ३४, रा. मुंगसापुर, ता.कन्नड) व साईनाथ गौतम पटाईत (रा.निमगाव, ता.वैजापुर) हे दोघे  औरंगाबादकडून  कन्नडकडे जात होते समोरून येणाऱ्या अज्ञात ट्रकने  समोरून  येणाऱ्या मोटारसायकलला धडक दिली.

यात मोटारसायकलस्वार भगवान गायकवाड हा जागीच ठार झाला. साईनाथ गौतम पटाईत हे जखमी झाल्याने त्यांना उपचारासाठी औरंगाबाद येथे हलविले. अपघात हा औरंगाबाद ते कन्नड महामार्गाचे काम चालू असून एकेरी वाहतूक चालू असल्याने  अज्ञात वाहनाने मोटरसायकलला समोरून धडक दिल्याने  झाला. अपघाताची माहिती मिळताच महामार्ग पोलिस मदत केंद्राचे सहायक पोलिस निरीक्षक सुरेश भाले, पोलिस उपनिरीक्षक श्री.मोरे, पोलिस अंमलदार बाबुराव जाधव, पोलिस नाईक श्री. गायकवाड, शरद दळवी, शांताराम सोनवणे भेट देत घटनेचा पंचनामा करून वाहतूक सुरळीत केली.

संपादन - गणेश पिटेकर

loading image