Sambhaji Nagar News : विविध घटनांत दोन तरुण बेपत्ता

विविध दोन घटनांत दोन तरुण घरातून निघून गेले आहेत. हर्सूल आणि चिकलठाणा भागात हे प्रकार घडले असून संबंधित पोलीस ठाण्यात हरवल्याची नोंद करण्यात आली आहे.
sambhaji nagar
sambhaji nagarsakal

छत्रपती संभाजीनगर : विविध दोन घटनांत दोन तरुण घरातून निघून गेले आहेत. हर्सूल आणि चिकलठाणा भागात हे प्रकार घडले असून संबंधित पोलीस ठाण्यात हरवल्याची नोंद करण्यात आली आहे.

पहिल्या घटनेत चिकलठाणा दहीहंडे गल्ली येथील अभिषेक वसंत दहीहंडे (वय १९) हा तरुण २० डिसेंबरला सकाळी सात वाजता क्लासेसला जातो असे सांगत घरातून निघून गेला आहे. अभिषेकचा रंग गोरा, पांढऱ्या रंगाचा टी शर्ट, हातात स्मार्ट वॉच आहे.

या प्रकरणी सिडको एमआयडीसी पोलीस ठाण्यात हरवल्याची नोंद करण्यात आली आहे. या प्रकरणी विष्णु मुंढे तपास करीत आहेत.

sambhaji nagar
Sambhaji Nagar : सर्दी, खोकला साथ साथ ; एकाच रुग्णालयात दिवसाकाठी तब्बल ५० ते ६० रुग्ण

दुसऱ्या घटनेत दयानंद सुभाष दणके (रा. हर्सुल, गल्ली क्रमांक १, छत्रपती संभाजीनगर) हा तरुण २५ जानेवारीला घरातून निघून गेला आहे. दयानंदचा रंग गोरा, उंची साडेपाच फुट, सडपातळ बांधा, अंगात पांढऱ्या रंगाचा शर्ट, निळ्या रंगाची जिन्स आहे. या प्रकरणी हर्सुल पोलीस ठाण्यात हरवल्याची नोंद करण्यात आली असून जमादार काकडे तपास करीत आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com