शान वाढणारी मेट्रो असेल, मुख्यमंत्री ठाकरेंनी दिला औरंगाबादकरांना शब्द

'अगोदर झारीचे शुक्राचार्यांना बाजूला करुन लोकांना पाणी द्या'
Uddhav Thackeray Sabha In Aurangabad
Uddhav Thackeray Sabha In Aurangabadesakal

औरंगाबाद : जी मेट्रो होईल ती शहराचे विद्रूपीकरण होणारी नसेल, ती औरंगाबादची शान वाढणारी असेल. शिवसेनेने ८८ साली औरंगाबाद नगरपालिका जिंकली होती. एवढी वर्षी झाली तरी उत्साह तोच आहे, असे कौतुक उद्गार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज औरंगाबादमधील सभेविषयी काढले. येथील शिवसेनेच्या शाखेच्या वर्धापन दिनानिमित्त मुख्यमंत्री ठाकरे यांची जाहीर सभा पार पडली. यावेळी उद्योगमंत्री सुभाष देसाई, रोहयो मंत्री संदिपान भुमरे, महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार, नीलम गोऱ्हे, खासदार संजय राऊत यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. (Uddhav Thackeray Says, Metro Rail To Be Increase Aurangabad's Beauty)

Uddhav Thackeray Sabha In Aurangabad
बाळासाहेबांनी मुस्लिमांचा द्वेष करायचे कधी सांगितले नाही - उद्धव ठाकरे

दहा-दहा दिवसांनी पाणी येत होते. अगोदर झारीचे शुक्राचार्यांना बाजूला करुन लोकांना पाणी द्या, असे केंद्रेकरांना सांगितले असल्याचे ठाकरे म्हणाले. मी मुद्दामून औरंगाबादच्या पाणी प्रश्नावर बोलायचे आहे. बाकीचे विषय महत्त्वाचे नाही. कुठेही फसवेगिरी नाही. जुन्या पाणी योजनांना पैसा देत आहोत. ती १९७२ ची योजना सडून गेली आहे. त्यासाठी पैसा देतोय. जी मेट्रो होईल ती शहराचे विद्रूपीकरण होणारी नसेल, ती औरंगाबादची शान वाढणारी असेल.

Uddhav Thackeray Sabha In Aurangabad
देशात २०२४ मध्ये पुन्हा मोदींच्या नेतृत्वाखालील सरकार, आठवलेंची भविष्यवाणी

महानगरपालिका मेट्रोचा आराखडा तयार करित असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यावेळी सांगितले. अगोदर चिकलठाणा विमानतळाचे नाव छत्रपती संभाजी महाराज विमानतळ करण्यासाठी आक्रोश करा, असा टोला त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपला लगावला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com