Bhagwat Karad : पक्षाने आदेश दिल्यास लढू ; फडणवीस यांची घेतली भेट,महायुती बळकट करणार

पक्षाने आदेश दिल्यास आपण लढू. सध्या क्लस्टर प्रमुखाची जबाबदारी पक्षाने सोपवली आहे.
Bhagwat Karad
Bhagwat Karad sakal

नागपूर : पक्षाने आदेश दिल्यास आपण लढू. सध्या क्लस्टर प्रमुखाची जबाबदारी पक्षाने सोपवली आहे. त्याचीच माहिती देण्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीसाठी नागपूरला आलो असल्याचे केंद्रीय राज्यमंत्री भागवत कराड यांनी सांगितले.

उमेदवारी दिल्यास पक्षाचा आदेश मान्य असेल. पण मला अगोदरच क्लस्टर प्रमुखपदाची जबाबदार सोपवण्यात आली आहे. मी सध्या लोकसभेमध्ये काम पाहत आहे. कुठल्याही ठिकाणी एखादा पक्ष निवडणूक लढला की त्या ठिकाणी बळकटी मिळतेच.

संभाजीनगर भाजपकडे आले तर त्या पक्षाला बळकटी येईल. शिंदे यांची शिवसेना लढल्यास त्यांना बळ मिळेल. आमच्यापैकी कोणीही लढले महायुती बळकट होईल आणि पंतप्रधान नरेंद्र मोदीच शपथ घेतील, असाही दावा त्यांनी केला. महायुतीच्या जास्तीत जास्त जागा निवडून आणण्यासाठी आम्ही रात्रंदिवस काम करत आहोत.\

Bhagwat Karad
Uddhav Thackeray :‘मोदी सरकार’ नको, ‘भारत सरकार’ हवे ; हुकूमशाहीशी थेट लढत

परभणी, हिंगोली, नांदेड या तीन लोकसभेच्या क्लस्टर प्रमुख असून त्याचा अहवाल देण्यासाठी मी आलो होतो. प्रतापराव पाटील चिखलीकर, रासपचे महादेव जानकर यांच्या मतदारसंघात प्रचार यंत्रणा अत्यंत चांगल्या पद्धतीने कामाला लागलेली आहे. १५ तारखेला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची परभणीत सभा होणार आहे, असेही कराड यांनी सांगितले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com