

Chhatrapati Sambhajinagar Accident
sakal
वैजापूर : शहरातील गंगापूर रोडवर बुधवारी (ता. १७) दुपारी भरधाव ट्रकच्या धडकेत ज्येष्ठ दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. मन्साराम दशरथ आव्हाळे (रा. जयभवानी नगर, आघूर) असे त्यांचे नाव आहे. ते महावितरणचे सेवानिवृत्त कर्मचारी होते. या घटनेमुळे शहरातून होणाऱ्या अवजड वाहतुकीचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.