Santosh Deshmukh Case
esakal
छत्रपती संभाजीनगर : मस्साजोगचे (जि. बीड) सरपंच संतोष देशमुख (Santosh Deshmukh Case) यांच्या हत्याकांडात वाल्मीक कराड हाच मुख्य सूत्रधार असल्याचा जोरदार युक्तिवाद सरकारी वकील अमरजितसिंह गिरासे यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात केला. या हत्याकांडात विनाकारण गोवल्याचा आरोप करत कराडच्यावतीने खंडपीठात जामीन अर्ज दाखल केला. न्या. एस.एम. घोडेस्वार यांच्यासमोर युक्तिवाद झाला.