
छत्रपती संभाजीनगर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील विभागांत कुलगुरू, प्र-कुलगुरू, कुलसचिवांनी गुरुवारी अचानक भेटी दिल्या. त्यावेळी विभागप्रमुखांसह प्राध्यापक, कर्मचारी वेळेत उपस्थित नसल्याचे आढळले. त्यावर कुलगुरू डॉ. विजय फुलारी यांनी तीव्र नाराजी व्यक्त करत लेटलतिफांना समज दिली.