Chhatrapati Sambhajinagr : सर्वसामान्यांना मिरची ‘तिखट’; लसणाचा भाव १६० रुपये किलो, उन्हामुळे फळांना वाढली मागणी

उन्हाच्या झळा वाढत आहेत. पालेभाज्यांची आवक घटली आहे. पालेभाज्यांच्या किमतीही वाढल्या आहेत.
vegetable and fruit rate garlic 160 rs kg food market price arrival
vegetable and fruit rate garlic 160 rs kg food market price arrival Sakal

जाधववाडी : उन्हाच्या झळा वाढत आहेत. पालेभाज्यांची आवक घटली आहे. पालेभाज्यांच्या किमतीही वाढल्या आहेत. याचा सर्वाधिक फटका हा किरकोळमधून खरेदी करणाऱ्यांना होणार आहे. दरम्यान, ५०० रुपये किलोवर गेलेल्या लसूण आवाक्यात आला आहे. नवीन ओला लसणाची रविवारी (ता. १०) १४० ते १६० रुपये किलोने विक्री झाली.

टरबूज, खरबूज, द्राक्षे या फळांची मागणी वाढली आहे. दरम्यान, हिरवी मिरची ८० तर लिंबाचे भाव १५० रुपये किलो झाल्याचे विक्रेते राजू शेळके यांनी सांगितले. येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत ४ ते १० मार्चदरम्यान २७ ट्रकमधून २ हजार क्विंटल बटाट्याची आवक झाली.

तीन वाहनांतून १०० क्विंटल काश्मिरी सफरचंदाची आवक झाली. जवळपास ३५ वाहनांतून १२ लाख नारळांची आवक झाली. यासह २५ मोठ्या वाहनांतून १५ लाख नग अननसाची आवक झाली; तसेच ६० ते ६५ वाहनांतून पालेभाज्यांचीही आवक झाली.

उन्हाळी फळांना मागणी

उन्हाळ्याची चाहूल लागताच बाजारात नवीन द्राक्षे, टरबूज विक्रीसाठी आले. टरबूज हे १० ते १५ रुपये किलोने विक्री झाले. द्राक्षे २० ते ४० रुपये किलोने विक्री होत आहेत. नवीन मोसंबीची रविवारी १३ क्विंटलची आवक झाली. त्यास १ हजार ५५० रुपये दर मिळाला. किरकोळमध्ये ३० ते ३५ रुपयांनी विक्री झाली.

आठ क्विंटल डाळिंबाची आवक झाली. त्यास ४,००० रुपयांचा दर मिळाला. किरकोळमध्ये ४० ते ५० रुपयांचा दर होता. ५२ क्विंटल चिकूची आवक झाली. प्रति क्विंटल २ हजार रुपयांचा दर मिळाला. किरकोळमध्ये ३० ते ४० रुपये किलोने विक्री झाली. १२ क्विंटल अंजारची आवक झाली. त्यास पाच हजारांचा भाव मिळाला किरकोळ मध्ये ४० ते ४५ रुपये किलो विक्री झाला.

फुल मार्केट कोमेजले

गेल्या आठवड्यापासून फुलांची जेमतेम आवक होती. महाशिवरात्रीमुळे फुलांना मोठी मागणी होती. यामुळे फुलांना चांगला दरही मिळाला होता. दर कमी असल्याने फूल मार्केट सध्या विक्रीवर परिणाम दिसून येत आहे. रविवारी झेंडू ३० ते ४० रुपये किलोने विक्री झाला. गलांडाची फुले २० ते ४० रुपये किलोने विक्री झाली.

बिजली २० ते ४०, निशिगंधा १००, गुलाब १०० ते १५० रुपयांनी विक्री झाला. फूल बाजारात आठवडाभरात बिजली ५०० क्विंटल, गुलाब ५० क्विंटल, निशिगंधा १० क्विंटल, झेंडूची फुले १००० क्विंटल विक्री झाले, अशी माहिती जाधववाडीतील होलसेल फूल विक्रेते कृष्णा अशोकराव बनकर यांनी दिली.

बाजार समितीत रविवारी झालेली आवक आणि दर

भाज्या - आवक (क्विंटल) - ठोक दर (हजारांत) - किरकोळ दर (किलो)

  • हिरवी मिरची - ४२ -६,००० - ७०ते ८०

  • कांदे - २,७३० - १३५० - २५ ते ३०

  • फुलकोबी - ५५ -१२५० - ३० ते ४०

  • टोमॅटो -७८ - ९५० - ३० ते ३५

  • वांगे - ३२ -६०० - २५ ते ३०

  • गवार - ७ - ७,५०० - ७० ते८०

  • अद्रक - १७ - ७,००० - १०० ते १२०

  • काकडी - ४५- ८५० -२५ ते ३०

  • भेंडी -२९ -४,००० -५० ते ६०

  • शेवगा -२५ - २,२५० -५० ते ६०

  • पत्ताकोबी- ३२ -१,६५० - ३० ते ४०

  • लिंबू -१४ -९,५०० -१५० ते १६०

  • दोडके -०९ -३,००० -७० ते ८०

  • गाजर - ९७ -१,२०० -३० ते ४०

  • वटाणा - ३० -४,२५० -७०ते ८०

  • दुधी भोपळा - ०६ -१,०००- ३० ते ४०

  • सिमला मिरची -१८ -२,७५० -५० ते ६०

  • चवळी -०७ -१५०० -५० ते ६०

  • वालशेंगा - ११ -२,४०० - ३५ ते ४५

  • कारले - १२ -३,५०० -५० ते ६०

  • मधुमक्का - १४ -१,९०० -४० ते ५०

  • लसूण -१३० -७,५०० -१६० ते २२० ओला

  • मेथी -४,५०० जुड्या -४५० शेकडा -१० ते १५ जुडी

  • पालक -७,९०० जुड्या -३५० शेकडा -१० ते १५ जुडी

  • कोथिंबीर - ३४,००० जुड्या- १५० शेकडा -१० ते १५ जुडी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com