

Chhatrapati Sambhajinagar
esakal
जाधववाडी: उन्हाळ्याचा फटका शहरातील भाजी बाजाराला बसला आहे. टोमॅटो, वांगे, गाजर, भोपळा, भेंडी या भाज्यांची आवक घटली आहे. त्यामुळे यावेळी मागील आठवड्याच्या तुलनेत प्रतिकिलो १० ते २० रुपयांची वाढ झाली. काही भाज्यांचे दर सर्वसामान्यांच्या आवाक्यात असले तरी लसूण, लिंबू, अद्रक यांसारख्या आवश्यक मसाल्याच्या वस्तू अजूनही महाग असल्याने गृहिणींचे बजेट बिघडत आहे.