esakal | औरंगाबादेत E-Way Bill नसणाऱ्या वाहनांना तब्बल ६० लाखांचा दंड
sakal

बोलून बातमी शोधा

e way bill

औरंगाबादेत E-Way Bill नसणाऱ्या वाहनांना तब्बल ६० लाखांचा दंड

sakal_logo
By
प्रकाश बनकर

औरंगाबाद: राज्य जीएसटी कार्यालयतार्फे गेल्या ९ जूलैपासून औरंगाबाद-जालना रोडवर ई-वेबील विषयी कारवाई करण्यात येत आहे. यात गुरुवारपर्यंत (ता.१५) करमाड टोल नाक्यावर १४ हजार वाहनांची तपासणी करण्यात आली. यात ५० वाहनांकडे ई-वेबील (E-WayBill) नसल्यांने त्यांच्याकडून ६० लाख रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. राज्यकर जीएसटीचे सहआयुक्त आयएएस जी. श्रीकांत यांनी स्वत: रस्त्यावर उतरत वाहनांची तापसणी करीत ही कारवाई केली आहे. अशी माहिती राज्यतर उपायुक्त रवींद्र जोगदंड यांनी गुरुवारी (ता.१५) दिली.

ई-वे बील संदर्भात पहिल्यांदाच एखादा आयएएस दर्जाचा अधिकारी थेट रस्त्यावर उतरून कारवाई करण्याची पहिलीच वेळ आहे. जालन्यावरून मोठ्या प्रमाणावर स्टीलचे देभरात वितरण होते. यात अनेक उद्योजक,व्यापारी विना ई-वेबील न काढता साहित्याची वाहतूक करतात. हीच बाब हेरत राज्यकर जीएसटीचे सहआयुक्त जी.श्रीकांत यांनी अशी कर चोरी करणाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारला आहे. करमाड टोलनाक्यासह विविध ठिकाणी ही करावाई करण्यात आली आहे. जी. श्रीकांत यांनी चार महिन्यापुर्वा राज्यकर जीएसटीच्या सहआयुक्त म्हणून पदभार स्विकाराला आहे. यापुर्वी ते साडे तीन वर्षे लातूरचे जिल्हाधिकारी म्हणून त्यांची कामगिरी राज्यभर चांगलीच गाजली. पदभार स्विकारल्यानंतर कोविडच्या काळातही त्यांनी जीएसटीचा रेव्हीन्यूवर विशेष लक्ष दिले आहे. त्यानंतर आता थेट कारवाईसाठी रस्त्यावर उतरले आहेत.

हेही वाचा: कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सचिव निवडीत ‘अर्थ’कारण की ‘राज’कारण?

९ जूलै पासून दिवसरात्र ही ई-वेबीलसाठी वाहन तपाणसी करण्यात येत आहे. कर चुकवेगिराल आळा घालण्यासाठी ही मोहिम राबविण्यात येत असल्याचे राज्यकर जीएसटीचे सहआयुक्त जी.श्रीकांत यांनी सांगितले. ही कारवाई राज्यकर उपायुक्त रवींद्र जोगदंड, सहाय्यक राज्यकर आयुक्त मकरंद कंकाळ, माधव कुंभारवाड, धनंजय देशमुख, तुषार गावडे यांच्यासह २४ अधिकारी आणि ८७ राज्यकर निरिक्षक कर सहाय्यक या मोहिमेसाठी राबत आहेत.

loading image