Ladki Bahin Yojana: तिसऱ्या ‘बहिणी’चा लाभ होणार बंद; वैजापूरच्या ९ हजार महिलांची होणार फेरपडताळणी
Vaijapur News: वैजापूर तालुक्यात ‘माझी लाडकी बहीण’ योजनेतील वयोमर्यादा व एकाच घरातील तिसऱ्या लाभार्थींची फेर पडताळणी सुरू झाली आहे. एकूण ९,३७५ लाभार्थींची तपासणी अंगणवाडी सेविकांमार्फत सुरू आहे.
वैजापूर : एकाच घरात लाभ घेत असलेल्या तिसऱ्या बहिणींसह ६५ वर्षे झालेल्या, तसेच २१ वर्ष पूर्ण नसलेल्या ‘लाडक्या बहिणीं’ची फेर पडताळणी शासनाने हाती घेतली आहे. यासाठी तालुका प्रशासनाकडे ९ हजार ३७५ बहिणींची यादी प्राप्त झाली.