Verul Ajanta Mahotsav 2024 : श्रेयाच्या गाण्यांना ‘वन्स मोर’चा घोष ; हिंदी-मराठी रचनांची बरसात, उत्तरोत्तर रंगलेल्या मैफलीत रसिक दंग

येथील सोनेरी महालात रविवारी (ता. पाच) वेरूळ-अजिंठा आंतरराष्ट्रीय महोत्सवाचा समारोप श्रेया घोषाल यांच्या लाइव्ह कॉनर्स्टने झाला. ‘सुन रहा हैं ना तू...’ या गीताने श्रेयाने गायनाला सुरवात केली. एकापेक्षा एक गीतांची ही मैफल उत्तरोत्तर रंगत गेली. रसिकांनी ‘वन्स मोर’चा घोष करीत श्रेया यांना दाद दिली.
Verul Ajanta Mahotsav 2024
Verul Ajanta Mahotsav 2024sakal

छत्रपती संभाजीनगर : येथील सोनेरी महालात रविवारी (ता. पाच) वेरूळ-अजिंठा आंतरराष्ट्रीय महोत्सवाचा समारोप श्रेया घोषाल यांच्या लाइव्ह कॉनर्स्टने झाला. ‘सुन रहा हैं ना तू...’ या गीताने श्रेयाने गायनाला सुरवात केली. एकापेक्षा एक गीतांची ही मैफल उत्तरोत्तर रंगत गेली. रसिकांनी ‘वन्स मोर’चा घोष करीत श्रेया यांना दाद दिली.

श्रेया यांना लाइव्ह ऐकण्यासाठी प्रेक्षक आतुर झाले होते. श्रेया यांनीही एकापेक्षा एक सरस गाणी सादर करत जबरदस्त सादरीकरण केले. ‘बहार बहारा...’, ‘मैं मारी जावा...’, ‘तुम क्या मिलें...’, ‘मन ये साहेबजी...’,

‘ओ साथी रे दिन डुबेना...’, ‘बेपनाह प्यार हैं आजा...’, ‘दिवानी ये...’, ‘बरसो रे...’, ‘मेरे ढोलना...,’ ‘नगाडे संग ढोल बाजें...’,‘घर मोरे परदेसिया आओ पधारो पियाँ...’ ही त्यांची गाजलेली गाणी त्यांनी सादर केली. या शहरात गाणे गाण्याचा आनंद काही वेगळाच आहे. तुमच्यासमोर गाताना मला आनंद होतोय, असे म्हणत त्यांनी गुलजार यांनी लिहिलेले ‘ओ साथी रे’ या गाण्यावर जबरदस्त परफॉर्मन्स दिला. तोच एका प्रेक्षकाने त्यांना मराठी गाणी सादर करा, असे म्हटले. श्रेया यांनी लगेच हो म्हणते म्हणत ‘जीव रंगला’, ‘बहरला हा मधुमास नवा’, ‘चंद्रा...’ ही गाणी सादर केली. श्रेया यांना प्रसिद्ध गायक किंजल चॅटर्जी यांनी साथ दिली. ‘मेरे बिना मैं रहने लगा हूँ’, ‘यारो दोस्ती बड़ी ही हसी हैं’, ‘नैनोंकी मत मानिए’ ही गाणी किंजल यांनी सादर केली.

मोबाइल टॉर्चच्या प्रकाशात दाद

प्रेक्षकांचा विक्रमी प्रतिसाद बघून श्रेया घोषाल भारावल्या होत्या. मोबाइलचा फ्लॅश लाइट लावून रसिक प्रत्येक गाण्यावर डोलत होते. शेवटी-शेवटी तर जिथे जागा मिळेल तिथे अगदी सोनेरी महालच्या भिंतीच्या बाजूला बसून श्रोते कार्यक्रम बघत होते. अधेमध्ये ‘आय लव्ह यू श्रेया’ अशी साद घालत होते.

Verul Ajanta Mahotsav 2024
Verul Ajanta Mahotsav 2024 : वेरूळ-अजिंठा महोत्सव खंडित होणार नाही ; संदीपान भुमरे,छत्रपती संभाजीनगरचे वैभव सर्वदूर पोचेल

‘महोत्सव नियमित सुरू ठेवण्यासाठी कटिबद्ध’

‘वेरूळ-अजिंठा आंतरराष्ट्रीय महोत्सवात खंड न पडता दरवर्षी नियमित आयोजन करण्यासाठी आपण कटिबद्ध आहोत. नागरिक व लोकप्रतिनिधी म्हणून या महोत्सवासाठी सर्वतोपरी मदत करू’’, अशी ग्वाही राज्याचे गृहनिर्माण, इतर मागास कल्याणमंत्री अतुल सावे यांनी दिली. सोनेरी महाल येथे रविवारी या महोत्सवाची दिमाखात सांगता झाली. यावेळी खासदार इम्तियाज जलील, विभागीय आयुक्त मधुकरराजे आर्दड, महोत्सवाचे मार्गदर्शक दिलीप शिंदे, महापालिका प्रशासक जी. श्रीकांत, नांदेडचे जिल्हाधिकारी अभिजित राऊत, जालन्याचे जिल्हाधिकारी श्रीकृष्ण पांचाळ, धुळ्याचे जिल्हाधिकारी अभिनव गोयल, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीना, पोलिस आयुक्त मनोज लोहिया, पोलिस अधीक्षक मनीष कलवानिया, लोहमार्ग पोलिस अधीक्षक मोक्षदा पाटील, प्रभारी जिल्हाधिकारी डॉ. अरविंद लोखंडे, पर्यटन सदिच्छादूत नवेली देशमुख आदी उपस्थित होते. एकेकाळी वेरूळ-अजिंठा महोत्सवाचे निवेदक असलेले इम्तियाज जलील यांनी महोत्सवाच्या आठवणींना उजाळा दिला.

कथ्थक फ्युजनचा अंदाज निराळा

कथ्थक नृत्याची बैठक, सौंदर्य आणि कथ्थक घराण तितक्याच चपळाईने सादर केलेल्या कथ्थक फ्युजनने वेरूळ अजिंठा आंतरराष्ट्रीय महोत्सव गाजवला. महोत्सवाच्या तिसऱ्या आणि समारोपाच्या दिवशी अभिनेत्री ऊर्मिला कानेटकर, वैदेही परशुरामी आणि कुमार शर्मा यांच्यासह १० कलाकारांच्या कथ्थक रॉकर्स ग्रुपने नृत्याचे अविस्मरणीय सादरीकरण केले. तिन्ही कलाकारांनी मंचावर कथ्थकच्या वेगवेगळ्या रचना सादर केल्या. कलेचे इंद्रधनुष्य सादर करण्याची संधी मिळाली, असे म्हणत कलाकारांनी कथ्थक फ्युजनची सुरवात करत विष्णू अवतारम हे विलोभनीय नृत्य सादर केले. यामध्ये त्यांनी लखनौ आणि जयपूर घराण्याचा अंदाज दाखवला. शिव आणि शक्ती आधारित रचना, दोन मैत्रिणींच्या गप्पा, राधा-कृष्णाच्या भावनांवर आधारित ठुमरी दाखविल्या. ऊर्मिला यांनी ‘बाजे बाजे रे मुरलिया बाजे’, वैदेही यांनी ‘गरज गरज आज मेघा’ या रचनेवर स्वतंत्र सादरीकरण केले. कलाकारांचे फ्युजन, बोल, नृत्य, अभिनय, वेशभूषेने रसिक प्रभावित झाले. तीध तालवर कथ्थक चक्कर सादर करत कथक फ्युजनचा समारोप झाला.

आसनव्यवस्थेचा घोळ कायम

वेरूळ अजिंठा आंतरराष्ट्रीय महोत्सवातील आसनव्यवस्थेचा गोंधळ शेवटच्या दिवसापर्यंत कायम राहिला. अधिकाऱ्यांनी व्हीआयपींच्या आसनव्यवस्थेत नातेवाइकांना बसविल्याने तिकीट घेऊन आलेल्या रसिकांना या आसनव्यवस्थेत प्रवेश मिळाला नाही. यामुळे रसिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. महोत्सवाचा समारोप, त्यात रविवार यामुळे अनेकांनी कुटुंबासह तिकीट काढले होते. पण त्यांना कार्यक्रमाचा आनंद घेता आला नाही. पहिल्याच कार्यक्रमानंतर सुरक्षारक्षकांनी थेट लोखंडी अडथळे लावून ठेवले. त्यामुळे आतील प्रेक्षकांना बाहेर जाता येईना. सुरक्षेच्या नावाखाली सुरक्षारक्षकांचे उद्धट वर्तन आणि अधिकाऱ्यांनी अनेकदा हुज्जत घातली. एका व्यक्तीने मग थेट पर्यटन विभागाच्या अधिकाऱ्याला शिव्या दिल्या. व्हीआयपींच्या नावाखाली आपल्याच नातेवाइकांनी प्रवेश दिल्याने रसिक मात्र प्रचंड संतापले होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com