बिडकीनमध्ये लवकरच बीज व फळप्रकिया उद्योग सुरु होणार, फलोत्पादन मंत्री भुमरेंची माहिती

3Sandipan_20Bhumare
3Sandipan_20Bhumare

आडुळ (जि.औरंगाबाद) : बिडकिन डीएमआयसी परिसरात पाचशे एकर क्षेत्रात लवकरच बीज व फळप्रकिया उद्योग सुरु करण्यात येणार आहे. यामुळे तालुक्यातील शेतकऱ्यांच्या मालाला चांगला भाव तर मिळेलच शिवाय तालुक्यातील सुशिक्षित बेरोजगार तरुणांना मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध होईल, असे फलोत्पादन व रोजगार हमी योजना मंत्री संदिपान भुमरे यांनी सांगितले. शनिवारी (ता.२४) रोजी गेवराई बु. (ता.पैठण) येथे आयोजित नागरी सत्कार कार्यक्रमाप्रसंगी ते बोलत होते.


श्री.भुमरे म्हणाले, कि हा उद्योग जून महिन्यातच सुरु होणार होता. मात्र कोरोनाच्या महामारीमुळे तो सुरु होऊ शकला नाही. मात्र आता लवकरच हा उद्योग सुरु होणार आहे. याबाबत माझे मुख्यमंत्र्यांशी चर्चा झाली आहे. पाचोड येथील कृषी उत्पन्न उपबाजार समितीत शेतकऱ्यांच्या मोसंबी इतर शेतीमालासाठी लवकरच शीत साठवण प्रकल्प सुरु करण्यात येणार आहे. शेतकऱ्यांच्या मालाला चांगला भाव देखील मिळेल. पैठण-औरंगाबाद रस्त्याच्या चौपदरीकरणाच्या कामाला मंजुरी मिळाली आहे.

तसेच पैठण येथील संतपीठ लवकरच चालु होईल. दाभरुळ येथील गुगळा देवी मंदिर संस्थांप्रमाणे गेवराई बु. येथील गडावर असलेल्या श्री. नगदेश्वर देवस्थान परिसरातील विकासकामाच्या माध्यमातून कायापालट करु असे मंत्री भुमरे यांनी सांगितले. यावेळी जिल्हा परिषदचे माजी अर्थ व बांधकाम संभापती विलास भुमरे, कृष्णा चव्हाण, माजी उपसरपंच सोपान थोरे, माजी सरपंच रघुनाथ आगलावे, आडुळ खुर्दचे माजी सरपंच आशोक भावले, माजी सरपंच बाजीराव राठोड, माजी सरपंच भिमराव ढाकणे, रजापुरचे माजी सरपंच असाराम गोर्डे, माजी सरपंच नरहरी आगलावे, भाऊसाहेब वाघ, विजय वाघ, भाऊसाहेब कोल्हे, प्रल्हाद वाघ, स्वप्निल आगलावे, भरत फटागंळे, रामकिसन थोरे, अशोक भोला, ग्रामसेवक रमेश जाधव, तलाठी माधवी लिंगायत, कृषी सहायक सोनी वाघ, सतीश राख, अंबरसिंग बहुरे, एकनाथ जाधव, अर्जुन चव्हाण, प्रभाकर आगलावे, गेवराईचे प्रशासक श्री. गायकवाड, सुधाकर पिवळ यांची उपस्थिती होती.


संपादन - गणेश पिटेकर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com