Republic Day 2024 : ग्रामीण पोलिस दलातील दोनअधिकाऱ्यांचा गाैरव ; उत्कृष्ट पोलिस सेवेसाठी राष्ट्रपती पदक जाहीर

ग्रामीण जिल्हा पोलीस दलातील कार्यरत उपविभागीय पोलिस अधिकारी आणि सहायक फौजदार यांना गुणवत्तापूर्वक उत्कृष्ट पोलिस सेवेसाठी राष्ट्रपती पदक जाहीर झाले आहे. सध्या कन्नड उपविभागात कार्यरत असलेले उपविभागीय पोलिस अधिकारी विजयकुमार नरसिंगराव ठाकूरवाड आणि मोटार परिवहन शाखेत कार्यरत सहायक फौजदार शहबाज खान दिलावर खान पठाण यांना हे पदक जाहीर झाले.
sambhaji nagar
sambhaji nagar sakal

छत्रपती संभाजीनगर: ग्रामीण जिल्हा पोलीस दलातील कार्यरत उपविभागीय पोलिस अधिकारी आणि सहायक फौजदार यांना गुणवत्तापूर्वक उत्कृष्ट पोलिस सेवेसाठी राष्ट्रपती पदक जाहीर झाले आहे. सध्या कन्नड उपविभागात कार्यरत असलेले उपविभागीय पोलिस अधिकारी विजयकुमार नरसिंगराव ठाकूरवाड आणि मोटार परिवहन शाखेत कार्यरत सहायक फौजदार शहबाज खान दिलावर खान पठाण यांना हे पदक जाहीर झाले.

sambhaji nagar
Republic Day 2024 Wishes : प्रजासत्ताक दिनानिमित्त द्या मराठीतून खास शुभेच्छा, पाहा लिस्ट

ठाकूरवाड हे १९९३ मध्ये सरळ सेवेद्वारे पोलीस उपनिरीक्षक म्हणून पोलिस दलात भरती झाले. १९९५ ते १९९९ या वर्षात त्यांनी गोंदिया जिल्ह्यातील चिंचगड या नक्षलग्रस्त भागात सर्च ऑपरेशन राबवून चार नक्षलींना शस्त्रासह अटक केली होती. इतकेच नव्हे, तर जालना तालुक्यात एका खुनाचा क्लिष्ट गुन्हा उघडकीस आणत आरोपींना अटक केली होती. ३१ वर्षाच्या पोलिस सेवेत अतिउत्कृष्ट कार्याबद्दल त्यांना विशेष सेवापदक तसेच आंतरिक सुरक्षा सेवा पदक त्याच प्रमाणे पोलिस महासंचालक यांच्या सन्माचिन्हानेही यापूर्वी गौरविण्यात आलेले आहे.

शहबाज खान दिलावर खान पठाण १९९२ मध्ये पोलिस शिपाई म्हणून भरती झाले. त्यांना गुणवत्तापूर्ण सेवेसाठी पोलिस महासंचालकांचे सन्मानचिन्ह प्रदान करण्यात आले. सेवा कालावधीत त्यांना ३१० बक्षिसे देण्यात आलेली आहेत. त्यांनी उत्कृष्ट सेवेची ३१ वर्षे पूर्ण केलेली आहेत. दोन्ही अधिकाऱ्यांचे पोलिस अधीक्षक मनिष कलवानिया यांनी अभिनंदन केले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com