esakal | सिल्लोड-कन्नड मार्गावर रास्ता रोको आंदोलन, ग्रामस्थ आक्रमक | Aurangabad
sakal

बोलून बातमी शोधा

सावखेडा (जि.औरंगाबाद) : सिल्लोड-कन्नड राज्य महामार्गावर रास्ता रोको आंदोलन करताना गावकरी.

सिल्लोड-कन्नड मार्गावर रास्ता रोको आंदोलन, ग्रामस्थ आक्रमक

sakal_logo
By
सचिन चोबे

सिल्लोड (जि.औरंगाबाद) : तालुक्यातील (Sillod) सावखेडा बुद्रुक येथील गावकऱ्यांनी पूर्णा नदीवर पुलाचे बांधकाम करण्याच्या मागणीसाठी सोमवार (ता.चार) सिल्लोड-कन्नड राज्य महामार्गावर म्हसला, सावखेडा फाट्यावर सकाळी आठ वाजेच्या सुमारास रास्ता रोको आंदोलन केले. गेल्या वीस वर्षांपासून सावखेडा येथील नागरिक पूर्णा नदीवर मोठ्या पुलाची मागणी करीत आहेत. यासाठी गावकऱ्यांचा शासन (Aurangabad) दरबारी सतत पाठपुरावा सुरू आहे. परंतु केवळ आश्वासन देऊन बोळवण होत असल्याने गावकऱ्यांनी आंदोलनाचा पवित्रा घेतला. सावखेडा गावातून सिल्लोड-कन्नड राज्यमार्गावर येण्यासाठी पूर्णा नदी पार करून यावे लागते. या नदीवर अतिशय छोटा व जुने बांधकाम असलेला पूल आहे.

हेही वाचा: संताप अन् संतापच ! चिखलातून काढावी लागली मुलीची अंत्ययात्रा

थोड्या पाण्यात देखील पुलावरून पाणी वाहने सुरू होते. अनेक वर्षांपासून पुलाच्या मुख्य समस्येपासून गावकऱ्यांची सुटका होत नसल्याने गावकऱ्यांनी या प्रश्नी आंदोलन करण्यासाठी प्रशासनास निवेदन दिले होते. सोमवार रोजी सकाळीच गावकऱ्यांनी राज्यमार्गावर आंदोलन करीत रास्ता रोको केला. यावेळी प्रशासनाच्या वतीने नायब तहसीलदार प्रभाकर गवळी यांनी आंदोलनाच्या ठिकाणी भेट देत, पुलाच्या कामासाठी मंजुरी मिळाली असून लवकरच कामास सुरुवात होणार असल्याचे सांगितले. परंतु गावकऱ्यांनी अनेक दिवसांपासून कामास मंजुरी मिळाली असल्याचे सांगण्यात येत आहे. काम मात्र सुरू होत नसल्याचे सांगून घोषणाबाजी केली.

हेही वाचा: तुळजाभवानी मातेच्या नवरात्रास गुरूवारपासून होणार प्रारंभ

loading image
go to top