मतदार यादी पुनरीक्षणासाठी १३ नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ

मतदार यादी पुनरीक्षणासाठी १३ नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ
Published on: 
मतदार यादी पुनरीक्षणासाठी १३ नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ ---- दावे-हरकतींचा निपटारा २५ नोव्हेंबरपर्यंत; अंतिम मतदार यादी ३० नोव्हेंबरला प्रसिद्ध होणार सकाळ वृत्तसेवा नांदेड, ता. ३१ : महाराष्ट्रातील मतदार यादीच्या विशेष सखोल पुनरीक्षण (एसआयआर) प्रक्रियेला भारत निवडणूक आयोगाने मुदतवाढ दिली आहे. त्यानुसार मतदार यादीतील नावांबाबत दावे व हरकती दाखल करण्याची मुदत १३ नोव्हेंबर २०२६ पर्यंत वाढविण्यात आली आहे. तसेच दावे-हरकतींच्या नोटीस टप्प्यातील कार्यवाही आणि त्यांचा निपटारा २५ नोव्हेंबरपर्यंत पूर्ण करण्यात येणार आहे. अंतिम मतदार यादी ३० नोव्हेंबर रोजी प्रसिद्ध होणार आहे. आयोगाने जाहीर केलेल्या सुधारित वेळापत्रकानुसार, मतदारांना मतदार यादीतील आपले नाव, वैयक्तिक तपशील आणि नोंदी तपासून आवश्यक दावे व हरकती दाखल करता येणार आहेत. या प्रक्रियेसाठी मतदारांना पुरेसा कालावधी मिळावा, या उद्देशाने मुदतवाढ देण्यात आली आहे. महाराष्ट्रासह १९ राज्ये व केंद्रशासित प्रदेशांमध्ये १ ऑक्टोबर २०२६ ही पात्रता तारीख निश्चित करून विशेष सखोल मतदार यादी पुनरीक्षण प्रक्रिया राबविण्यात येत आहे. महाराष्ट्रात ३१ ऑगस्ट २०२६ रोजी प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली होती. मतदारांनी प्रारूप यादीतील आपले नाव आणि तपशील तपासून आवश्यक दावे किंवा हरकती निर्धारित मुदतीत दाखल कराव्यात, असे आवाहन केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.