

A 53-year-old woman from Kannad died during treatment after being hit by a goods jeep at Sajapur Chowfuli in Waluj.
बजाजनगर : भरधाव मालवाहू जीपने धडक दिल्याने गंभीर जखमी झालेल्या महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. ही घटना गुरुवारी (ता. २३) सायंकाळी वाळूज औद्योगिक वसाहतीमधील साजापूर चौफुली येथे घडली. रुकायाबी मकसूद अली सय्यद (वय ५३, रा. माळीवाडा, कन्नड) असे मृत महिलेचे नाव आहे. अपघातानंतर जीपचालक वाहनासह घटनास्थळावरून पसार झाला.