

CCTV cameras captured a theft of iron materials from companies under construction in Waluj MIDC.
esakal
बजाजनगर : वाळूज औद्योगिक वसाहतीत चोरट्यांनी उच्छाद मांडला आहे. चड्डी गँगच्या दहशतीनंतर आता कंपन्यांमधील लोखंडी साहित्य चोरण्यासाठी महिला चोरांचाही सुळसुळाट वाढला. पहाटेच्या अंधाराचा फायदा घेत बांधकाम सुरू असलेल्या कंपन्यांमधील लोखंडी सळया आणि अन्य साहित्य लंपास केले जात आहे. रविवारी पहाटे एफ सेक्टरमधील दोन कंपन्यांना लक्ष्य करण्यात आले. विशेष म्हणजे चोरीचे संपूर्ण चित्रण सीसीटीव्ही कॅमेऱ्यांत कैद झाले असतानाही चोरट्यांचा बंदोबस्त करण्यासाठी पोलिसांची यंत्रणा किती तत्पर आहे, असा संतप्त सवाल उद्योजक उपस्थित करीत आहेत.