Sambhaji Nagar : वक्फ न्यायाधिकरणाचे कामकाज पाच फेब्रुवारीपासून सुरू करा ; खंडपीठ : रिक्तपदे न भरल्याबाबत खुलासा करण्याचे आदेश

संपूर्ण राज्य कार्यक्षेत्र असलेल्या वक्फ न्यायाधिकरणातील एक सदस्य अतिरिक्त जिल्हाधिकारी यांची नियुक्ती करून ता.५ फेब्रुवारीपासून न्यायाधिकरणाचे कामकाज सुरु करण्याचे निर्देश गुरवारी (ता.२५) मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्यायमूर्ती रवींद्र घुगे आणि न्यायमूर्ती वाय.जी. खोब्रागडे यांनी दिले.
sambhaji nagar
sambhaji nagar sakal

छत्रपती संभाजीनगर : संपूर्ण राज्य कार्यक्षेत्र असलेल्या वक्फ न्यायाधिकरणातील एक सदस्य अतिरिक्त जिल्हाधिकारी यांची नियुक्ती करून ता.५ फेब्रुवारीपासून न्यायाधिकरणाचे कामकाज सुरु करण्याचे निर्देश गुरवारी (ता.२५) मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्यायमूर्ती रवींद्र घुगे आणि न्यायमूर्ती वाय.जी. खोब्रागडे यांनी दिले.

वक्फ न्यायाधिकरणातील रिक्त पदासंदर्भात ॲड. जावेद देशमुख यांनी दाखल केलेल्या याचिकेवर यापूर्वी झालेल्या सुनावणीत खंडपीठाने दिलेल्या आदेशांचे पालन करून ६० दिवसांत सर्व रिक्त पदे न भरल्याबाबत खुलासा करण्याचे आदेशही प्रधान सचिव, अल्पसंख्याक विभाग यांना देण्यात आले आहेत. याशिवाय रिक्त पदे कधी भरणार? अशी विचारणाही खंडपीठाने केली आहे. या याचिकेवर गुरवारी (ता.२५) झालेल्या सुनावणीत ॲड. जावेद देशमुख यांच्या वतीने ज्येष्ठ विधिज्ञ राजेंद्र देशमुख यांनी निदर्शनास आणून दिले, की संपूर्ण तयार असलेल्या हज हाउसमध्ये वक्फ न्यायाधिकरणाचे कामकाज केवळ हज हाउसच्या उद्‌घाटनाभावी होऊ शकलेले नाही.

sambhaji nagar
Sambhaji Nagar News : शासकीय वसतिगृहांत सुविधांची वानवा ; मराठवाड्यात ५१ वसतिगृहे, विद्यार्थी संख्या साडेपाच हजारांवर

या वक्फ न्यायाधिकरणाचे कार्यक्षेत्र संपूर्ण राज्य असून, दाखल प्रकरणांची संख्या मोठी आहे. न्यायाधिकरणासाठी २१ पदे मंजूर असूनही केवळ आठ पदे भरण्यात आली आहेत. सर्व रिक्त पदे ६० दिवसांत भरण्याचे आदेश खंडपीठाने २० ऑगस्ट २०२३ ला दिले होते. मात्र त्याची अंमलबजावणी ९० दिवस उलटूनही झालेली नाही.

न्यायाधिकरणात चेअरमन जिल्हा न्यायाधीश आणि मुस्लिम स्कॉलर सदस्यांची नियुक्ती झालेली आहे. मात्र तिसरे सदस्य अतिरिक्त जिल्हाधिकारी हे पद अजून रिक्त असल्याने न्यायाधिकरणाचे कामकाज सुरु होऊ शकलेले नाही. गुरवारी सुनावणीअंती खंडपीठाने आदेश देत पुढील सुनावणी ५ फेब्रुवारीला ठेवली. याचिकाकर्ता ॲड. जावेद देशमुख यांच्या वतीने ज्येष्ठ विधिज्ञ राजेंद्र देशमुख, वक्फ बोर्डातर्फे ॲड. नजम देशमुख तर राज्य शासनातर्फे ॲड. पवन लखोटिया यांनी काम पाहिले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com