Water Supply : पाण्याचे वेळापत्रक कोलमडले! सुरळीत होण्यासाठी लागणार आणखी पाच-सहा दिवस

महापालिकेच्या पाणी पुरवठा करणाऱ्या दोन्ही योजना जुन्या झाल्यामुळे वारंवार फुटत आहेत.
Water Supply
Water Supplyesakal

छत्रपती संभाजीनगर : कधी पाईपलाईन फुटली तर कधी फिडलमध्ये धामन गेली, अशा अनेक कारणांमुळे शहराच्या पाणी पुरवठ्यात सतत अडथळे येत आहेत. परिणामी शहराचा पाणीपुरवठा विस्कळीत आहे.

विशेषत: जुन्या शहरातील वसाहतींमधील भाग अधिक प्रभावित झाले आहेत. पाणी पुरवठा सुरळीत होण्यासाठी आणखी पाच-सहा दिवस लागणार आहे. शहरातील सर्वच भागांत पाण्याचे टप्पे उशिराने मिळणार असल्याचे महापालिका प्रशासनाने सांगितले आहे.

महापालिकेच्या पाणी पुरवठा करणाऱ्या दोन्ही योजना जुन्या झाल्यामुळे वारंवार फुटत आहेत. त्यासोबतच तांत्रिक बिघाडही होत असल्याने शहराला होणारा पाणी पुरवठा विस्कळीत झाला आहे. गेल्या दोन महिन्यांपासून विस्कळीतपणा कमी होण्याऐवजी वाढतच आहे.

शनिवारी जायकवाडी पंपगृहात धामण शिरल्याने पाणी पुरवठा बंद पडला. त्यासोबत रेल्वेस्टेशन जवळ ७०० मिलिमीटर व्यासाची जलवाहिनी फुटली. त्याअगोदर गेवराईजवळ ७०० मिलीमीटर व्यासाची जलवाहिनी फुटल्यामुळे पाणी पुरवठा बंद करावा लागला होता.

Water Supply
Khadakwasala Dam Water : खडकवासला धरणसाखळीतील पाणीसाठा गतवर्षीपेक्षा साडेचार टीएमसीने कमी

वारंवार जलवाहिनी फुटणे, विद्युत प्रवाह खंडित होणे, ट्रान्सफार्मर जळणे, तांत्रिक बिघाड होणे यासारख्या घटना नेहमीच्याच झाल्या आहेत. आधीच शहराला चार दिवसांआड पाणी पुरवठा होत आहे. त्यातच अधुनमधून पाणी पुरवठा विस्कळीत होत असल्याने महापालिकेचे वेळापत्रकानुसारचे नियोजन देखील कोलमडले आहे.

सलग चार दिवस कोणत्या ना कोणत्या कारणांमुळे पाणी पुरवठा योजनेत विघ्न येत असल्यामुळे शहरात पाणीटंचाई निर्माण झाली आहे. अशा परिस्थतीतही महापालिकेकडून पाणी पुरवठा करण्याचा प्रयत्न सुरू आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com