Chhatrapati Sambhajinagar : जिल्ह्यात पाण्याचे ७७ टक्के स्त्रोत चकाचक

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सहाशे ग्रामपंचायतींना ‘हिरवे’ तर १९८ गावांना मिळाले ‘पिवळे कार्ड’
Clean Water
Clean Watersakal

छत्रपती संभाजीनगर - जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने पावसाळा सुरू होण्याआधी जिल्ह्यातील पिण्याच्या पाण्याचे सर्वेक्षण केले. यात तब्बल ७७ टक्के पाण्याच्या स्त्रोतांचा परिसर स्वच्छ असल्याचे आढळून आले. त्यामुळे जिल्ह्यातील ८६४ पैकी ६६६ ग्रामपंचायतींना हिरवे कार्ड देण्यात आले. त्या तुलनेत कमी स्वच्छता असणाऱ्या १९८ ग्रामपंचायतींना पिवळे तर एकाही ग्रामपंचायतीस ‘रेड कार्ड’ देण्यात आलेले नाही.

आरोग्य विभागाकडून होणाऱ्या या पाहणीत प्रत्येक वेळेस पाणी स्रोतांच्या परिसरात अस्वच्छता आढळतेच. त्यामुळे ग्रामपंचायतींना लाल व पिवळे कार्ड दिले जाते. पण आताच्या तपासणीत लाल कार्ड असलेली एकही ग्रामपंचायत आढळलेली नाही.

दरम्यान, आरोग्य विभागाने मॉन्सूनपूर्व करण्यात आलेल्या सर्वेक्षणात एकही ग्रामपंचायतीच्या हद्दीतील पाण्याचा स्रोत अस्वच्छ आढळला नाही. ग्रामपंचायतींनी स्त्रोतांचा परिसर स्वच्छ ठेवण्याकडे लक्ष दिले. १९८ ग्रामपंचायतीतील स्रोतांच्या परिसरात कमी स्वरूपात स्वच्छता आढळल्याने त्यांना पिवळे कार्ड देऊन परिसर स्वच्छतेच्या सूचना दिल्या आहेत.

दरम्यान मॉन्सूनपूर्व केलेल्या सर्वेक्षणात जिल्ह्यात ९४२ नळ स्रोत, १०१७ बोअर, हातपंप तर ५३१ विहिरी असे २ हजार ४९० स्रोतांचे सर्वेक्षण करण्यात आले आहे.

निकषानुसार दिले जाते कार्ड

सर्वेक्षणात पाणी स्रोतांच्या आजूबाजूचा परिसर स्वच्छ आहे का, नळपाणी योजना असेल तर या परिसरात कुठे पाणी गळती होत आहे का याची पाहणी केली जाते. बोअर असेल या स्रोतांच्या साधारण पंधरा मीटर परिसरातील स्वच्छता पाहणी केली जाते. या काही निकषांच्या आधारे तपासणी करून त्यानुसार ग्रामपंचायतींना ‘कार्ड’ दिले जातात.

ना ‘रेड कार्ड, ना चंदेरी

ज्या ग्रामपंचायतीमध्ये अनियमित पाणी शुद्धीकरण, पाणी स्रोतांचा परिसर अस्वच्छ, नळ गळती, ग्रामपंचायतीस टीसीएल पावडरचा पुरेसा साठा नसणे, वर्षभर जलजन्य साथरोगांचा उद्रेक अशा ग्रामपंचायतींना ‘रेड कार्ड’ देण्यात येते. सलग पाच वर्ष साथीचा उद्रेक न झालेल्या व पाच वर्षे हिरवे कार्ड मिळालेल्या असे दोन्ही निकष पूर्ण करणाऱ्या ग्रामपंचायतींना ‘चंदेरी कार्ड’ देण्यात येते, मात्र जिल्ह्यात हे दोन्ही कार्ड कोणत्याच ग्रामपंचायतीला मिळालेले नाही.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com