esakal | दोन दिवसाआड पाणीपुरवठा करावा - सुमित खांबेकर
sakal

बोलून बातमी शोधा

Aurangabad News MNS Sumit Khambekar

सगळीकडे वर्क फ्रॉम होम सुरु आहे. शाळांना सुट्टी आहे. यामुळे घरातल्या सदस्यांची संख्या वाढली आहे. सरकार दर तासाला हात धुवायला सांगत आहे. तसेच कोरोनामुळे घरे, बंगले, अपार्टमेंट धुतले जात आहेत. अत्यावश्‍यक कामासाठी बाहेर जाणाऱ्यांचे कपडे सतत धुवावे लागत आहेत. यामुळे पाण्याची गरज दुप्पट झाली आहे.

दोन दिवसाआड पाणीपुरवठा करावा - सुमित खांबेकर

sakal_logo
By
अतुल पाटील

औरंगाबाद : कोव्हीड १९ हा आजार म्हणजेच कोरोना व्हायरसचे संकट जगभर थैमान घालत आहे. यात महाराष्ट्र आणि औरंगाबादही अपवाद नाही. एक कोव्हीड १९ रुग्ण औरंगाबादेत आढळली मात्र, त्याही बऱ्या झाल्याने संकट तात्पुरते टळले आहे. तरीही याचा प्रसार थांबवण्यासाठी मुबलक पाणी गरजेचे आहे. अशी मागणी मनसेचे राज्य उपाध्यक्ष सुमीत खांबेकर यांनी महापालिका आयुक्तांकडे केली आहे.

आयुक्तांना दिलेल्या निवेदनात म्हटले कि, शहरात सध्या पाच ते सहा दिवसांआड केवळ ३० ते ४५ मिनीट पाणी सोडले जाते. मात्र कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर तो कमी पडत आहे. त्याचे कारण म्हणजे सगळीकडे वर्क फ्रॉम होम सुरु आहे. शाळांना सुट्टी आहे. यामुळे घरातल्या सदस्यांची संख्या वाढली आहे.

औरंगाबादच्या इतर बातम्या वाचण्यासाठी - क्लिक करा

सरकार दर तासाला हात धुवायला सांगत आहे. तसेच कोरोनामुळे घरे, बंगले, अपार्टमेंट धुतले जात आहेत. अत्यावश्‍यक कामासाठी बाहेर जाणाऱ्यांचे कपडे सतत धुवावे लागत आहेत. यामुळे पाण्याची गरज दुप्पट झाली आहे.

मराठवाड्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी - क्लिक करा

या परिस्थितीत महापालिकेने एक किंवा दोन दिवसाआड किमान दीड तास पाणीपुरवठा सुरु करावा. ही मागणी पुर्ण झाल्यास कोरोनाशी दोन हात करण्यात प्रत्येक नागरिकाचा सहभाग घेण्यास मदत होईल. अशी विनंती करण्यात आली आहे. आयुक्तांनी सकारात्मक प्रतिसाद दिल्याचे श्री. खांबेकर यांनी सांगितले.

महाराष्ट्रातील इतर बातम्या बाचण्यासाठी - क्लिक करा