
औरंगाबाद - फेब्रुवारी-मार्च २०२० मध्ये घेण्यात आलेल्या माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा (दहावी) आणि उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा बारावीच्या उत्तरपत्रिका शिक्षकांना घरी तपासणीसाठी देण्याची परवानगी देण्यात आली आहे. कोरानाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी हा निणर्य घेण्यात आल्याची माहिती राज्य मंडळाने जाहिर केलेल्या पत्रात म्हटले आहे.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात येणारी बारावी बोर्डाची परीक्षा १८ फेब्रुवारीपासून सुरु झाली होती. तर ३ मार्च पासून दहावीच्या परीक्षेस सुरुवात झाली. बारावीचे पेपर संपले आहेत. तर दहावीचा एक पेपर बाकी आहे. जगभरात कोराना व्हारसने थौमान घातला आहे. या पार्श्वभूमीवर सरकारी पातळीवर विविध उपाय योजना करण्यात येत आहे. मात्र दिवसेंदिवस रुग्णांची वाढती संख्या पाहता गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळा, सॅनिटायझरचा वापर करा, वारंवार हात धुवा आजारी असाल तर घरीच आराम करा अशा सूचना देण्यात आल्या आहेत.
शिवाय शाळा-महाविद्यालयांना देखील सुट्या देण्यात आल्या आहेत. मात्र दहावी बारावीची विद्यार्थी संख्या ही लाखोंच्या घरात आहे. उत्तरपत्रिका मूल्यांकन आणि नियमन करण्यासाठी पूर्वी शाळा व महाविद्यालयात शिक्षकांच्या नावाने उत्तरपत्रिकांचे पार्सल पाठविण्यात येत होते. मात्र, सदर प्रक्रियेत गोपनीयता राखली जात नव्हती. गैरप्रकार होण्याची शक्यता विचारत घेता अशा गोष्टींना आळा बसवण्यासाठी उत्तरपत्रिकांचे नियमन आणि मूल्यांकन करण्याची कार्यपद्धत ऑक्टोंबर २००७ मध्ये बदलण्यात आली होती. राज्यात कोरोना आजाराच्या प्रादुर्भाव वाढत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून माध्यमिक शाळा व उच्च माध्यमिक शाळा, कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षकांना सुट्टी देण्यता आल्या आहे.
आश्चर्य वाचा - आम्ही अंभईचे, निघाले मुंबईचे... बारावीच्या परीक्षेतील प्रकार
त्यामुळे शाळेत येऊन उत्तरपत्रिकांचे परीक्षण व नियमन करण्यात अडचणीचे ठरणार आहे. सदर परिस्थित विचारात घेता व दोन्ही परीक्षांचे निकाल वेळेत लागणे आवश्यक आहे. मात्र, शाळेत येऊन उत्तपत्रिकांचं परीक्षण आणि नियमन करण्यात अडचणी येत आहेत. याच पार्श्वभूमीवर दोन्ही परीक्षांचे निकाल वेळेत लागणं आवश्यक असल्यानं या परीक्षेच्या उत्तरपत्रिका काही अटी आणि शर्तीसहीत शिक्षकांना घरी देण्याचे आदेश सरकारनं दिले आहेत. त्यानुसार, या आदेशाचे पालन करत उत्तरपत्रिका घरी देण्याचा निर्णय घेतला आहे, असं बोर्डानं जारी केलेल्या पत्रकामध्ये म्हटलं आहे.
वाचा... विनाअनुदान शाळांना मिळणार अनुदान
पेपर तपासणीसाठी शिक्षकांना अटी ः
---
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.