अटी-शर्तींचं पालन करणार; परवानगीनंतर मनसेची ग्वाही

पंधरा अटी-शर्तींसह राज ठाकरेंच्या औरंगाबादमधील सभेला पोलिसांनी परवानगी दिली आहे.
Bala Nandgaonkar
Bala Nandgaonkar

औरंगाबादमध्ये होणाऱ्या राज ठाकरेंच्या सभेला पोलिसांनी परवानगी दिली आहे. पण यासाठी १५ विविध प्रकारच्या अटी पोलिसांनी घातल्या आहेत. या सर्व अटी-शर्तींचं पालन केलं जाईल अशी ग्वाही मनसेकडून देण्यात आली आहे. मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. (Will abide by the terms and conditions testimony of MNS after permission of police)

Bala Nandgaonkar
राज ठाकरेंच्या औरंगाबाद सभेला परवानगी देऊ नये; सचिन खरात यांची मागणी

नांदगावकर म्हणाले, "अटी-शर्तींच पालन केलं जाईल, असं आम्ही पोलिसांना कळवलं आहे. कायदा-सुव्यवस्था तुम्हाला जशी राखायची आहे, तशी ती राखण्याचं आमचंही कर्तव्य आहे. आम्ही नियमांची अंमलबजावणी करु. सभेच्या मैदानाची क्षमता १५ हजार असली तरी येणाऱ्या लोकांना थांबवू शकत नाही. त्यामुळं जेवढी लोकं येतील त्यांना कसं आवरायचं याची व्यवस्था आम्ही पोलिसांशी सहकार्य करुन आम्ही करु. उद्या सकाळी १२ वाजता पोलीस आयुक्तांच्या दालनात आमची बैठक आहे. त्या बैठकीतही काही चर्चा होईल, त्याप्रमाणं आम्ही पुढे जाऊ"

Bala Nandgaonkar
IMDचा पाच राज्यांना ऑरेंज अ‍ॅलर्ट; कमाल तापमानाचा उच्चांक

पोलिसांनी त्यांचं काम केलेलं आहे आता आम्ही आमचं काम करणार आहोत. त्यापुढे काही झालं तर पोलीस त्यांच्या कामाला आहेतच. आम्हाला पोलिसांची कोणतीही अट जाचक वाटत नाही, कारण पोलिसांचा अटी-शर्तींचा हा नेहमीचा फॉर्मेट असतो. कदाचित आमच्या सभेला जास्त नियम असू शकतील, एवढचं. आमच्या सभेनं पोलिसांना भीती वाटण्याचं कारण नाही. कारण त्यांना सतर्क असणं गरजेचं असत तसेच त्या दिवशी आणि पुढील दोन दिवस प्रचंड कार्यक्रम आहेत. त्यामुळं काळजी घेणं पोलिसांचं कर्तव्य आहे.

Bala Nandgaonkar
राज ठाकरेंच्या सभेला अखेर परवानगी; अटी-शर्ती पाळाव्या लागणार

जेवढ्या अटींचं पालन करता येईल त्याचं पालन करण्याचा आम्ही प्रयत्न करु. पण लोकांनी म्हटलं की आवाज येत नाही तर मग आवाजाच्या नियमाबाबत विचार करता येईल. अन्यथा आम्ही मर्यादा बाळगूनचं सर्व गोष्टी करु. आमच्या सभेसाठी दोनच दिवस शिल्लक असताना कोणतीही अडचण येणार नाही. पोलिसांनी सभेसाठी परवानगी दिल्यानं मनसेमध्ये सर्वांनाच आनंद आहे. सभा निश्चितच रेकॉर्ड ब्रेक होईल आणि ऐतिहासिक सभा होईल, असा विश्वास मनसेचे नेते दिलीप धोत्रे यांनी व्यक्त केला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com