Chhatrapati Sambhajinagar : जायकवाडीत बुधवारी सोडणार पाणी?

पोलिस ठाण्यात ठिय्या दिलेल्या टोपेंना आश्वासन
Chhatrapati Sambhajinagar
Chhatrapati SambhajinagarSakal

छत्रपती संभाजीनगर : पाणी सोडण्याच्या मागणीसाठी जालना रस्त्यावरील आंदोलनकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेत वेगवेगळ्या पोलिस ठाण्यात नेले. आमदार राजेश टोपे यांच्यासह कार्यकर्त्यांना सिडको एमआयडीसी पोलिस ठाण्यात नेण्यात आले. या ठिकाणी १२ जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

दरम्यान, पोलिस ठाण्याच्या समोर टोपे व त्यांच्या समर्थकांनी ठिय्या आंदोलन सुरू केले. अखेर रात्री आठ वाजता गोदावरी मराठवाडा पाटबंधारे महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी बुधवारी (ता. २२) पाणी सोडण्याचे लेखी आश्वासन दिले. त्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.

गोदावरी मराठवाडा पाटबंधारे महामंडळाच्या कार्यालयासमोर झालेल्या आंदोलनानंतर पोलिसांनी राजेश टोपे व त्यांच्या समर्थकांना ताब्यात घेत सिडको एमआयडीसी पोलिस ठाण्यात नेले. त्यानंतर टोपे यांनी पोलिस ठाण्याच्या समोरच ठिय्या देत आंदोलन सुरू केले. लेखी आश्वासन मिळेपर्यंत उठणार नाही अशी भूमिका घेतली.

अखेर उशिरा रात्री आठ वाजता अधीक्षक अभियंता संदीप सोनवणे, कार्यकारी अभियंता राजू देशमुख यांनी पोलिस ठाण्यात धाव घेत लेखी आश्वासन दिले. मंगळवारी सर्वोच्च न्यायालयात याचिकेवर सुनावणी आहे. त्यानंतर बुधवारी मंत्रिमंडळाची बैठक होणार आहे, त्यानंतर त्याच दिवशी निर्णय घेण्यात येईल, असे लेखी आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.

टोपेंसह १२ जणांवर गुन्हे

सिडको एमआयडीसी पोलिस ठाण्यात आमदार राजेश टोपे यांच्यासह सतीश टोपे, कल्याण सपाटे, रमेश दांडगे, अमोल लहाने, अमोल तौर, दत्तात्रय फुलझळके, बळीराम पाटीलबा तारक, कैलास कोरडे, संतोष आदमाने, विकास कवाळे आणि मनोज मरकड या बारा जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com