esakal | पोलिसांच्या मध्यस्थीने कोरोना बाधितांना मिळाला ‘ऑक्सिजन’
sakal

बोलून बातमी शोधा

oxygen cylinder

पोलिसांच्या मध्यस्थीने कोरोना बाधितांना मिळाला ‘ऑक्सिजन’

sakal_logo
By
सुषेन जाधव

औरंगाबाद: निवासी भागात कोविड सेंटर सुरु करण्यास परवानगी कशी मिळाली? तसेच कोरोना बाधित रुग्णाचे नातेवाईक रात्री पार्किंगमध्ये झोपतात, गोंधळ घालतात या सर्व समस्यांमुळे या भागातील ज्येष्ठ नागरिक, लहानांना कोरोनाची बाधा होऊ शकते असा सवाल करत खासगी कोविड सेंटर हॉस्पीटलची लिफ्ट बंद केल्याचा प्रकार दुर्गानंद हाईट्समधील सुभश्री हॉस्पीटलमध्ये घडला.

लिफ्ट बंद झाल्याने कोरोना बाधित रुग्णांना वरच्या मजल्यावर ऑक्सीजन सिलेंडर नेता येणे शक्य नसल्याने हॉस्पीटल चालक डॉक्टरांनी थेट पोलिस ठाण्यात धाव घेतली असता, पोलिसांनी नागरिक, हॉस्पीटल प्रशासनात केलेल्या मधस्थीनंतर अखेर रुग्णांना ऑक्सीजन सिलेंडर पुरवठा करण्यासाठी लिफ्ट सुरु करण्यात आली. हा प्रकार सोमवारी (ता.२६) पुंडलिकनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडला.

हेही वाचा: दिलासादायक! मराठवाड्यात रिकव्हरी रेट वाढला, रुग्णवाढ घटली

या प्रकरणी उपनिरीक्षक व्ही. जी. घोडके हे वरिष्ठासह कर्तव्यावर असताना सुभश्री हॉस्पीटलचे डॉ. उदयसिंग राजपूत यांनी पोलिस ठाण्यात धाव घेत नागरिकांनी लिफ्ट बंद केल्याची आपबीती कथन केली. दरम्यान हॉस्पीटलमध्ये १२ रुग्ण हे ऑक्सिजनवर होते. सदर हॉस्पीटल हे दुर्गानंद हाईट्समध्ये असून १४ रहिवाशांनी लिफ्ट बंद केली असून ऑक्सीजन संपल्याने वर सिलेंडर नेण्यास नागरिक बाधा आणत असल्याचे पोलिसांना सांगत बाधितांच्या जीवनमरणाचा प्रश्‍नावर आपणच तोडगा काढा अशी विनंती केली.

यावर ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक घनश्‍याम सोनवणे यांच्यासह अधिकारी, कर्मचाऱ्यांनी धाव घेत संबंधित सदनिकाधारक व विकासक यांना बोलावून चर्चा केली. रहिवाशांचेही म्हणणे ऐकून घेतले. यावेळी रुग्णांचे नातेवाईकही आक्रमक झाल्याचे लक्षात येताच कोरोनाचे गांभीर्य ओळखून एपीय सोनवणे यांनी सर्वाचे समुपदेशन केले. अखेर सदनिकाधारक रहिवाशांनी डॉक्टरला लिफ्टची चावी देत लिफ्ट सुरु केली आणि रुग्णांना आयसीयु वार्डमध्ये ऑक्सीजन सिलेंडर नेता आले.

loading image
go to top