
भोकरदन : जम्मू - काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर देश हादरला. या घटनेचा जगभर निषेध होत आहे. या भागात गेलेल्या पर्यटकांचे अनुभव समोर येत आहेत. त्यात भोकरदन तालुक्यातील राजूर येथील रहिवासी ॲड. मनोज गणेश साबळे यांचा समावेश आहे. दहशतवाद्यांनी केलेल्या गोळीबारानंतर तेथे उडालेल्या धावपळीचे ते साक्षीदार होते. त्यांनी सांगितलेले तेथील काही अनुभव त्यांच्याच शब्दांत...