esakal | बिहारमधील महिलेच्या नातेवाइकांचा औरंगाबादमध्ये शोध 
sakal

बोलून बातमी शोधा

औरंगाबाद - बिहारमधील मधेपुर येथे निवारागृहातील औरंगाबादची महिला

मधेपुर येथील संरक्षण अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार त्या महिलेने तिचे नाव सांगितले तसेच तीचा पत्ता गल्ली नंबर २४,२६, क्रिस्ट कॉलनी, औरंगाबाद असा पत्ता सांगितला आहे. तसेच त्या महिलेचा मोठा दिर बालाजी तिरूपती सोनी हे वॉर्ड कमिशनर असल्याचेही सांगितले

बिहारमधील महिलेच्या नातेवाइकांचा औरंगाबादमध्ये शोध 

sakal_logo
By
मधुकर कांबळे

औरंगाबाद : महिनाभरापूर्वी ती चुकून औरंगाबादमधून थेट बिहारमध्ये पोचली. मात्र आपण कुठे आलो हे काही तीच्या लक्षात येईना. बिहारमध्ये ती महिला व बाल विकास विभागाच्या अधिकाऱ्यांना सापडली. तीला तिथे निवारागृहात ठेवून बिहारमधील अधिकारी येथील सखी संस्थेच्या मदतीने औरंगाबादमध्ये त्या महिलेच्या नातेवाइकांचा शोध घेत आहेत. तीच्या नातेवाइकांचा शोध लागला तर त्या महिलेची पुन्हा नातेवाइकांची भेट होईल या भावनेतून सखी (वन स्टॉप क्राईसेस सेंटर) चे सामाजिक कार्यकर्ते नातलगांचा शोध घेत आहेत. 

केंद्र शासनाच्या महिला व बाल विकास मंत्रालयातर्फे संकटग्रस्त महिलांना तातडीने मदत मिळावी यासाठी सखी (वन स्टॉप क्राईसेस सेंटर) ही २०१७ पासून योजना सुरू करण्यात आली आहे. पीडित महिलांना वैद्यकीय मदत, पोलिसांची मदत, मानसिक व सामाजिक आधार, समुपदेशन व कायदेशीर मदत मिळावी तसेच त्याच्या तात्पुरत्या निवाऱ्याची सोय व्हावी यासाठी सखी मार्फत प्रयत्न केले जाते.

औरंगाबादच्या इतर बातम्या वाचण्यासाठी - क्लिक करा

सखीच्या व्यवस्थापक ममता मोरे यांनी सांगितले , या सखीकडे बिहारमधील मधेपुर येथून या महिलेच्या नातेवाइकांचा औरंगाबादमध्ये शोध घेण्याविषयी पत्र पाठवण्यात आले आहे, त्यानुसार महिनाभरापूर्वी औरंगाबाद येथून सविता नंदकुमार सोनी (वय ४० वर्ष ) ही चुकून रेल्वेत बसली आणि थेट बिहारमधील मधेपुर येथे दाखल झाली. तिथे गांगरलेल्या अवस्थेत तिथल्या महिला व बाल विकास विभागाच्या संरक्षण अधिकाऱ्यांना आढळली. त्यांनी तिची विचारपूस करून तिला तिथल्या निवारगृहात ठेवले.

मराठवाड्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी - क्लिक करा

मधेपुर येथील संरक्षण अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार त्या महिलेने तिचे नाव सांगितले तसेच तीचा पत्ता गल्ली नंबर २४,२६, क्रिस्ट कॉलनी, औरंगाबाद असा पत्ता सांगितला आहे. तसेच त्या महिलेचा मोठा दिर बालाजी तिरूपती सोनी हे वॉर्ड कमिशनर असल्याचेही सांगितले. यासंदर्भात सिडको पोलिस स्टेशन येथे सखी मार्फत पत्र देऊन त्या महिलेच्या नातेवाइकांचा शोध घेऊन त्या महिलेला परत तिच्या नातेवाइकात आणण्यासाठी प्रयत्न करावे अशी विनंती करण्यात आली आहे. 

महाराष्ट्रातील इतर बातम्या बाचण्यासाठी - क्लिक करा

loading image