

Women farmers from Bhivdhanora celebrate their successful collective soybean harvest.
esakal
छत्रपती संभाजीनगर: यंदा दुष्काळ असून, या परिस्थितीत शेती करणे आव्हान आहे. मात्र, परिस्थितीपुढे हात न टेकता भिवधानोरा (ता. गंगापूर) येथील कृषी कन्या शेतकरी गटातील १५ महिलांनी सामूहिक कष्टांतून १५ एकरांत सोयाबीनचे १९७ क्विंटल उत्पादन घेतले. एकरी १३.१३ क्विंटलचा उतारा मिळवत आशेची पेरणी केली.