अर्ध्या रात्रीही महिलांना इथे मिळतो आधार 

photo
photo

औरंगाबाद : महिलांना कधीही कुठलीही अडचण आल्यास त्यांना हक्काचे आणि सुरक्षित ठिकाण शहरात उपलब्ध आहे. शासनासह खासगी संस्थेचे महिला आधारगृह कार्यरत असल्याने महिलांना तातडीची मदत मिळत आहे. त्यासाठी संकटात असलेल्या महिलांना केवळ संपर्क साधण्याची गरज आहे.
 
समाजात पीडित महिलांचे प्रमाण वाढत आहे. लैंगिक अत्याचारासारखा प्रसंग ओढवतो. कधी पतीच्या विवाहबाह्य संबंधामुळे कुटुंब उद्ध्वस्थ होते. अशा वेळी विविध कारणांनी स्त्री ही असुरक्षित होते. अशा महिलांसाठी हक्काच्या निवाऱ्याचे ठिकाण महिला आधारगृह आहे. कुठेही केव्हाही अडचणीत सापडलेल्या महिलांसाठी महिला व बालविकास विभागाच्या अंतर्गत महिलांसाठी सावित्रीबाई महिला राज्यगृह आणि कॉन्सील फॉर रुरल टेक्नॉलॉजी ॲण्ड रिसर्च इन्स्टियुट या संस्थेमार्फत सेजल महिला आधारगृह चालविले जाते. या दोन्ही संस्थांमध्ये महिलांना २४ तास घराप्रमाणेच सुरक्षित हक्काचा निवारा आहे. 

औरंगाबादच्या इतर बातम्या वाचण्यासाठी - क्लिक करा

अमूल्य जीवन 

अनेक महिला आत्महत्या करून स्वत:ला संपवतात. मात्र, जीवन हे अमूल्य आहे, अशा पद्धतीने जीवन संपवण्याची वेळ येऊ नये म्हणूनच महिलांसाठी आधारगृहांचा मोठा आधार आहे. अनेक वेळा महिलांना अर्ध्या रात्री घराबाहेर काढण्यात आल्याचे अनेक प्रकरणे आहेत. रात्रीच्या वेळी कुटुंबीयांनी महिलेला घराबाहेर काढलेच तर कुठे जावे असा प्रश्न असतो. त्यावेळी मात्र महिला स्वत: आधारगृहात जाऊन राहू शकते. या ठिकाणी एक दिवसापासून ते वर्षभरापर्यंत अगदी घराप्रमाणे मोफत राहता येते. 

मराठवाड्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी - क्लिक करा

पोलिसांचीही होते मदत 

अडचणीत सापडलेल्या महिलांना पोलिस किंवा विविध संस्था आधारगृहापर्यंत आणून सोडतात. काही प्रकरणात माहिती असलेल्या महिला स्वतः आधारगृहापर्यंत येतात. या ठिकाणी महिलांना अन्न, वस्त्र, निवारा या मूलभूत गरजांसह मानसिक आधार दिला जातो. स्वावलंबनासाठी शिवणकाम, मेणबत्ती बनवणे, हस्तकला, ब्यूटी पार्लर, मेंदी क्लासेस, कापडी बॅग बनवणे फॅशन डिझायनिंग असे प्रशिक्षणही दिले जाते. कौन्सिलिंग करून त्यांची नेमकी समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न केले जातात. कौटुंबिक हिंसाचाराच्या प्रकरणात सासरच्या मंडळींना बोलावून समज देण्यात येते किंवा गरज पडल्यास पोलिसांच्या मदतीने कायदेशीर कारवाई केली जाऊ शकते.  

महाराष्ट्रातील इतर बातम्या बाचण्यासाठी - क्लिक करा

इथे साधा संपर्क

महिला बालकल्याण विभागाचे सावित्रीबाई महिला आधारगृह (समतानगर) आणि सखी वन स्टॉप सेंटर कार्यरत आहे. त्यासाठी (क्र. १०९१, ८५३०३६०१८१) या क्रमांकावर संपर्क साधता येतो. सेजल आधारगृह हे पेठेनगर येथील निसर्ग कॉलनीमध्ये कार्यरत आहे. यासाठी (क्र. ९३२५३११८३१), ९८२२६२८०८१, ०२४०२३७१२९५) याठिकाणी संपर्क साधता येतो.  


महिलांसाठी शासनाचे महिला राज्यगृह आहे. याठिकाणी कुठलीही कसल्याही अडचणीतील महिलांना प्रवेश दिला जातो. महिलांचे पुर्नरवसन व्हावे यासाठी सर्वोतोरी प्रयत्‍न केले जातात. 
हर्षा देशमुख (जिल्हा महिला बालविकास अधिकारी)

सामाजिक बांधिलकी म्हणुन सेजल महिला आधारगृह चालवले जाते. याठिकाणी अडचणीत सापडलेल्या महिलेला आधार देवुन, स्वावलंबनासाठी विविध प्रशिक्षण दिले जाते. 
डॉ. अर्चना गणवीर (सेजल महिला आधारगृह)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com