

Women SHG
esakal
छत्रपती संभाजीनगर: नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्यात (पोकरा २.०) जिल्ह्यातील महिला बचत गटांना कृषी व्यवसायात प्रगती साधण्यासाठी अर्थसाह्य उपलब्ध करून देण्यात येणार आहे. गावपातळीवर कृषी अवजारे बँक स्थापन करण्यासाठी प्रकल्प मूल्याच्या ६० टक्क्यांपर्यंत व कमाल २४ लाख रुपयांपर्यंत अनुदान दिले जाणार आहे. प्रत्येक गावातून केवळ एका पात्र महिला गटाला या योजनेचा लाभ देण्यात येणार आहे, असे प्रकल्प संचालक धनश्री जाधव यांनी सांगितले.