World AIDS Day : Jalna एड्सबाधितांची दरवर्षी सरासरी शंभरीपार भर

जिल्ह्यात चार हजार ३३६ बाधित
World AIDS Day
World AIDS Daysakal media

जालना : जिल्ह्यात दरवर्षी सरासरी शंभरीपार एड्सबाधितांची भर पडत आहे. वर्ष २००९ पासून अपवाद वगळता हा आकडा शंभरच्या पुढेच आहे. एड्‌सचा पसरण्याचे मुख्य चार कारणांपैकी सर्वात महत्त्वाचे म्हणजे असुरक्षित शारीरिक संबंध असून यासंदर्भात जनजागृती झाल्यानंतर केवळ शारीरिक सुखाच्या क्षणांच्या घाईमुळे आज हजारो लोक आयुष्यातून उठले आहेत. जिल्ह्यात २००९ ते ऑक्टोबर २०२२ दरम्यान आढळलेल्या तब्बल चार हजार ३६६ सक्रिय एचआयव्ही बाधित रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

जगाच्या पाठीवर मागील अनेक वर्षांपासून एड्स आजाराने थैमान घातले आहेत. एड्स किंवा एचआयव्ही विषाणू प्रसार रोखण्यासाठी केंद्र शासनासह राज्य शासनही जनजागृतीवर दरवर्षी कोट्यवधी रुपये खर्च करते. याशिवाय एचआयव्हीचा प्रसार रोखण्यासाठी शासनाकडून राष्ट्रीय एड्स नियंत्रण कार्यक्रमाअंतर्गत एचआयव्ही बाधित रुग्णांना मोफत उपचार देण्यास सुरवात केली.

विशेष म्हणजे शासनाला एक एचआयव्ही चाचणीच्या टिकसाठी अडीचशे रुपये खर्च येतो. शिवाय बाधित रुग्णांतील एचआयव्ही विषाणूची वाढ रोखण्यासाठी शासनाकडून बांधित रुग्णाला प्रत्येक महिन्याला एक हजार २०० रुपयांच्या ३० एआरटीच्या गोळ्या मोफत पुरवल्या जातात. आजघडीला राज्यात तीन लाखांपेक्षा अधिक तर जिल्ह्यात चार हजार ३६६ एचआयव्ही बाधित रुग्ण आहेत. विशेष म्हणजे दरवर्षी या रुग्ण संख्येत भर पडत आहे. त्यामुळे एड्सचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने सजग राहून अनैतिक संबंध टाळले तर एड्‌स सारखा भयंकर आजार ही कोरोना प्रमाणेच हद्दपार होण्यास उशीर लागणार नाही

सव्वाअकरा लाख चाचण्या

राष्ट्रीय एड्‌स नियंत्रण कार्यक्रमांतर्गत २०१४ पासून ते ऑक्टोबर २०२२ दरम्यान जिल्ह्यातील अकरा लाख १२ हजार ३४ जणांची एड्स तपासणी करण्यात आली आहे. यामध्ये पाच हजार १७ हजार २०२ गर्भवती माता, अठरा वर्षांखालील १११ जणांची तर पाच लाख ९४ हजार ७२१ पुरुष व महिलांची एड्‌स चाचणी करण्यात आली आहेत.

एड्‌स नियंत्रण कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यातील जनजागृती केले जात आहे. सध्या चार हजार ३६६ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. असुरक्षित शारीरिक संबंधामुळे या रोगाची लागण होण्याचा सर्वाधिक धोका आहे.

-राजेंद्र गायकवाड,जिल्हा कार्यक्रम अधिकारी, जिल्हा एड्स प्रतिबंधक व नियंत्रण कक्ष, जालना.

समाजात वावरताना आज मोह,माया आणि आसक्ती आहारी जाण्याचे प्रमाण वाढत आहे. विषयाची आसक्ती झाली,की शारीरिक बाधा पोहोचते. श्रीमद् भगवतगीतेतील दुसऱ्या अध्यायातील ‘विषया विनिवर्तन्ते निराहारस्य देहिन:। या ५९ व्या श्लोकात चारित्र्याबाबत कसे वागावे हे सांगितले आहे.

-डॉ.प्रमोद कुमावत महाराज

आध्यात्मिक मार्गदर्शक, जालना

काही महत्त्वाच्या बाबी

अनैतिक शारीरिक संबंध टाळा

एकापेक्षा अधिक व्यक्तीसोबत शारीरिक संबंध ठेवू नका

दूषित रक्त दिल्याने किंवा एकच इंजेक्शनच्या दूषित सुयांचा वापर नको

एड्सबाधित गर्भवती मातेकडून गर्भातील बाळाला होते लागण

गर्भवती अवस्थेत एड्‌स चाचणी करून गर्भातील बालकावर उपचार करून गर्भातील बाळ एचआयव्ही मुक्त जन्माला येते.

वर्ष २००९ ते ऑक्टोबर २०२२ दरम्यानचे बाधित

पुरुष २,३५५

स्त्री १,८२४

पुरुष बालके १०१

स्त्री बालके ७८

तृतीयपंथी ०८

या ठिकाणी आहेत आयसीटीसी केंद्र

जिल्हा सामान्य रुग्णालय

जिल्हा स्त्री रुग्णालय

अंबड उपजिल्हा रुग्णालय

बदनापूर ग्रामीण रुग्णालय

भोकरदन ग्रामीण रुग्णालय

घनसावंगी ग्रामीण रुग्णालय

मंठा ग्रामीण रुग्णालय

परतूर ग्रामीण रुग्णालय

टेंभुर्णी ग्रामीण रुग्णालय

जिल्ह्यातील ४२ प्राथमिक केंद्र

१४ खासगी रुग्णालय

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com