esakal | यंदा फटाक्यांच्या किंमतीत पाच ते दहा टक्क्यांची वाढ, औरंगाबादेत विक्रेते सज्ज
sakal

बोलून बातमी शोधा

4fire_107

दिवाळीनिमित्त लागणारे फटाक्यांच्या विक्रीसाठी फटाके विक्रेत्यांतर्फे परवानगीची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली आहे.

यंदा फटाक्यांच्या किंमतीत पाच ते दहा टक्क्यांची वाढ, औरंगाबादेत विक्रेते सज्ज

sakal_logo
By
प्रकाश बनकर

औरंगाबाद : दिवाळीनिमित्त लागणारे फटाक्यांच्या विक्रीसाठी फटाके विक्रेत्यांतर्फे परवानगीची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली आहे. जिल्हाधिकारी,  महापालिकेकडून हिरवा कंदील दाखविल्यानंतर आता फक्त पोलिस आयुक्तालयाकडून परवानगी मिळाल्यानंतर विक्री सुरु होणार आहे. आठ नोव्हेंबरपर्यंत परवानगी मिळण्याची अपेक्षा विक्रेत्यांतर्फे व्यक्त केली जात आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा फटाक्यांच्या किंमतीत पाच ते दहा टक्के वाढ झाली असून विक्रीसाठी सज्ज राहण्यासाठी आम्ही तयार असल्याचे भारत माता फटाका संघटनेचे मनोज गायके यांनी सांगितले.

सास्तूर बलात्कार प्रकरणातील आरोपींना फाशी द्या, वंचितच्या महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष ठाकूर यांची मागणी


दरवर्षी दिवाळीच्या पंधरा दिवसांपूर्वी फटाके विक्री सुरू होते. यंदा कोरोनामुळे सर्व क्षेत्रांवर मोठा परिणाम झाला आहे. यामुळे सर्व सण उत्सव साध्या पद्धतीने साजरे करण्यात आले. कोरोनानंतर बाजारपेठा हळूहळू पूर्वपदावर येत आहेत. यातच दिवाळीनिमित्त फटाके विक्रेत्यांना मोठी अपेक्षा लागून आहे. यंदा कमी आवाजाचे व कमी प्रदूषण करणारे फटाके विक्रीसाठी ठेवण्यात येणार आहेत. यंदा टीव्ही सेंटर, कलाग्राम व बीड बायपास येथील फटाके विक्रीसाठी महापालिकेने हिरवा कंदील दाखवला आहे.

आता फक्त पोलिस परवानगीची प्रतीक्षा लागून आहेत. आठ नोव्हेंबरपर्यंत ही परवानगी मिळण्याची शक्यता ही फटाके विक्रेत्यांतर्फे व्यक्त केली जात आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा फटाक्यांचा किंमतीमध्ये पाच ते दहा टक्के वाढ असणार आहेत. अद्याप अयोध्यानगर येथील फटाका  संघटनेतर्फे परवानगीसाठी महापालिकेकडे कुठलेही अर्ज करण्यात आलेले नाही. यामुळे अयोध्यानगरीतील फटाक्यांच्या दुकानात उशीर होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.


महापालिकेने परवानगी दिलेले फटाका मार्केट
- टीव्ही सेंटर -३६ फटाका स्टॉल
-कलाग्राम-५० स्टॉल
बीड बायपास-१८


दिवाळी निमित्ताने किमान आठ दिवस अगोदरतरी फटाके विक्रीसाठी परवानगी देण्यात यावीत अशी अपेक्षा आहे. यंदा पर्यावरण पुरक फटाके विक्रीसाठी आलेले आहे.
- मनोज गायके, भारत माता फटाका संघटना

संघटना - गणेश पिटेकर

loading image