YIN Ministry Election : ‘यिन’च्या महाविद्यालयीन निवडणुकीचे वाजले बिगुल

भारत हे तरुणांचे राष्ट्र आहे, जेव्हा तरुणांना कृती करण्यास प्रवृत्त केले जाते, तेव्हा त्यांच्याकडे जग बदलण्याची शक्ती आणि गतिशीलता असते.
YIN Ministry Election
YIN Ministry Electionsakal

छत्रपती संभाजीनगर - भारत हे तरुणांचे राष्ट्र आहे, जेव्हा तरुणांना कृती करण्यास प्रवृत्त केले जाते, तेव्हा त्यांच्याकडे जग बदलण्याची शक्ती आणि गतिशीलता असते. या उद्देशाने ‘सकाळ’ माध्यम समूहाने ‘यंग इन्स्पिरेटर्स नेटवर्क’ (यिन) हे एक तरुणाईचे व्यासपीठ तयार केले. ‘यिन’च्या नेतृत्वविकास कार्यक्रमांतर्गत राज्यातील महाविद्यालयात ‘यिन’ निवडणुकीचे बिगुल वाजल्याने तरुणाईमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. उमेदवारी अर्ज भरण्यास सुरवात झाली आहे.

जिल्ह्यातील महाविद्यालयातून ऑनलाइन उमेदवारी अर्ज भरलेल्या विद्यार्थ्यांनी शहरात मोठ्या जल्लोषात फेरी काढून शक्तिप्रदर्शन केले. आपल्या उमेदवाराच्या समर्थनात घोषणा देत ‘सकाळ’ कार्यालयात उमेदवारी अर्ज सुपूर्द केला. जिल्ह्यातील प्रत्येक महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी मतदानाचा हक्क बजावण्यासाठी मतदान यादीत आजच नावनोंदणी करावी. मोबाइल ‘यिन’चे ॲप डाउनलोड करून मतदार यादीत नाव नोंदणी करता येते. सर्व उपक्रमाची माहिती यिनच्या ॲपवर मिळेल.

शहरातील महाविद्यालयात यिन निवडणुकीची जोरदार चर्चा व्हावी यासाठी फेरी काढून शक्तिप्रदर्शन करत ‘सकाळ’ कार्यालयाकडे उमेदवारी अर्ज सुपूर्द केला. यिनच्या माध्यमातून नेतृत्व करण्याची संधी भेटली आहे.

- विशाल डिडोरे पाटील, उमेदवार एमआयटी कॉलेज

मी ऑनलाइन उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. यिन ॲपवर जाऊन जास्तीत-जास्त विद्यार्थ्यांची मतदार नोंदणी करून घेतली. मला महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी क्रमांक एकची मते देऊन यिन अध्यक्ष म्हणून काम करण्याची संधी द्यावी.

- सुमेध गायकवाड, उमेदवार, देवगिरी कॉलेज

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com