उकाड्याचा बळी! पाणीपुरवठा टाकीच्या छतावर झोपलेल्या तरुणाचा...

दिवसभर प्रचंड तापमानामुळे रात्री उकाडा
Aurangabad News
Aurangabad Newsesakal

लोहगाव (जि.औरंगाबाद) : रात्रीचा उकाडा वाढल्याने ग्रामपंचायतीच्या पाणीपुरवठा टाकीच्या छतावर झोपलेल्या एका पस्तीस वर्षीय तरुणाचा कठड्यावर पडुन दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना तोंडोळी (ता.पैठण) येथे गुरुवारी (ता.१९) सकाळी उघडकीस आली. सुरेश रामकिसन मोडे असे मृताचे नाव आहे. याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, सुरेश मोडे हा गेल्या काही वर्षांपासून कुटुंबाचा उदरनिर्वाहासाठी पत्नीसह सासुरवाडी वांबोरी (ता.राहुरी) येथे वास्तव्यास गेलेला होता. तोंडोळी येथे पुतणीच्या लग्नाची हळदीसाठी बुधवारी (ता.१८) कुटुंबासह आला होता. दिवसभर प्रचंड तापमानामुळे रात्री उकाडा जास्त जाणवू लागल्याने तो ग्रामपंचायतीच्या पाणीपुरवठा टाकीच्या छतावर जाऊन झोपला असता रात्री झोपेतच कठड्यावर पडुन मृत झाला. (Youth Died After Falling From Water Tank Roof In Paithan Taluka Of Aurangabad)

Aurangabad News
"पवार बोलतात ते..." Open mike मध्ये जलील यांनी घेतली फिरकी

सकाळी पत्नीने पतीला उठवण्यासाठी घरातील मुलाला टाकीवर पाठवले असता तो कठड्यावर निपचित पडलेला होता. आवाज देऊन हलवूनही उठत नसल्याचे मुलाने घरी येऊन सांगितले तेव्हा घरातील व्यक्तीनी तिकडे धाव घेतली असता तो टाकीवरून पडल्याचे लक्षात आले. सरपंच संजय गरड, गोरख तांबे, माजी सरपंच देविदास पठाडे, अनिल पठाडे आदींच्या मदतीने तात्काळ बिडकीन (Bidkin) ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकाऱ्याने तपासून मृत घोषित केले. (Aurangabad)

Aurangabad News
भावाने मारलेल्या दगडामुळे बहिणीला गमवावे लागले प्राण

पोलीस पाटील मिनाबाई तांबे यांच्या खबरीवरून बिडकीन पोलीस ठाण्यात आकस्मिक गुन्हा दाखल करून सहायक पोलिस निरीक्षक संतोष माने यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक फौजदार सोमनाथ तांगडे यांनी पंचनामा केला. वैद्यकीय अधिकारी डॉ.दळवी यांनी शवविच्छेदन केल्यावर शोकाकुल वातावरणात दुपारी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. पुढील तपास सहायक फौजदार सोमनाथ तांगडे करित आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com