Sambhaji Nagar Accident : वाहन पंक्चर झाल्याने तरुणाचा घात ; जॅक निघाल्याने वाहनाखाली दबून मृत्यू

छत्रपती संभाजीनगर ते जळगाव महामार्गावरील फरशी फाटा परिसरात फुलंब्रीकडे येणाऱ्या पीव्हीसी पाइपने भरलेल्या पिकअपचा जॅक सटकल्याने पंक्चर जोडणाऱ्या २७ वर्षीय तरुणाचा पिकअपखाली दबून मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी (ता.१५) सकाळी घडली.
Sambhaji Nagar Accident
Sambhaji Nagar Accident sakal

फुलंब्री : छत्रपती संभाजीनगर ते जळगाव महामार्गावरील फरशी फाटा परिसरात फुलंब्रीकडे येणाऱ्या पीव्हीसी पाइपने भरलेल्या पिकअपचा जॅक सटकल्याने पंक्चर जोडणाऱ्या २७ वर्षीय तरुणाचा पिकअपखाली दबून मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी (ता.१५) सकाळी घडली.

करण संतोष शर्मा (वय २७, रा.खानदेश जळगाव) असे पिकअप खाली दबून मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी वडोद बाजार ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.याबाबत अधिक माहिती अशी की, छत्रपती संभाजीनगर-जळगाव राष्ट्रीय महामार्गावरून सिल्लोड वरून फुलंब्रीकडे जाणारा पिकअप (एम.एच-१९, एस-६३०१) वाहन फरशीफाट्याच्या परिसरातील एका हॉटेलसमोर पंक्चर झाली.

या वाहनामध्ये पीव्हीसी पाइपचा मोठा साठा होता. त्यामुळे या तरुणाने जॅक लावून टायर काढले. मात्र, सदरील टायर काढताना अचानक जॅक सटकल्याने सदरील वाहन एका बाजूने पीव्हीसी पाइपसह कोसळले.

Sambhaji Nagar Accident
Sambhaji Nagar Crime : ऊसतोडणीच्या वादातून महिलेचा खून ; ब्रम्हगाव येथील घटना,पोलिसांकडून तरुणास अटक

यात पंक्चरचे टायर काढत असणाऱ्या करणच्या अंगावर पिकअप वाहन कोसळल्याने दबून जागीच मृत्यू झाला. माहिती मिळताच वडोद बाजार पोलिसांनी घटनास्थळी गाव घेतली. महात्मा फुले क्रीडा मंडळाची रुग्णवाहिका चालक विजय देवमाळी यांनी सदरील या तरुणाला फुलंब्री येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. सदर घटनेची वडोद बाजार पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com