esakal | आत्महत्येची धमकी देते केले तरुणीला ब्लॅकमेल, तीन वर्षे अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार
sakal

बोलून बातमी शोधा

1crime_33

स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी शहरात आलेल्या उच्चशिक्षित तरुणीला आत्महत्येची धमकी देऊन ब्लॅकमेल केल्यावर तिच्यावर तब्बल तीन वर्षे अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला.

आत्महत्येची धमकी देते केले तरुणीला ब्लॅकमेल, तीन वर्षे अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार

sakal_logo
By
सुषेन जाधव

औरंगाबाद : स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी शहरात आलेल्या उच्चशिक्षित तरुणीला आत्महत्येची धमकी देऊन ब्लॅकमेल केल्यावर तिच्यावर तब्बल तीन वर्षे अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. शाकीर कासीम शेख (३०, रा. नाव्हा, ता. जि. जालना) असे संशयिताचे नाव असून, तरुणीच्या तक्रारीवरून त्याच्याविरोधात सिडको पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे.


जालना जिल्ह्यातील तरुणीचे बीए द्वितीय वर्षापर्यंत शिक्षण झालेले आहे. तिच्या वडिलांचे काही वर्षांपूर्वी निधन झाले असून, घरची परिस्थिती नाजूक आहे. संबंधित तरुणी स्पर्धा परीक्षेच्या अभ्यासासाठी मैत्रिणींसोबत शहरात भाड्याने खोली घेऊन राहत होती. वर्ष २०१७ मध्ये शेख शाकीर याच्यासोबत तिची मैत्री झाली. दोघेही जालना जिल्ह्यातील असल्याने तरुणीचा त्याच्यावर विश्वास बसला. शाकीरने तिला स्पर्धा परीक्षेची तयारी करताना आपण एका करिअर अ‍ॅकॅडमीमध्ये असल्याचे सांगितले होते.

त्यामुळे शाकीर याचा मैदानी सराव चांगला असेल म्हणून दोघेही पोलिस अधीक्षक कार्यालयामागील गोकूळ स्टेडियमवर सरावासाठी जाऊ लागले. याच काळात ऑक्टोबरमध्ये शाकीरने तिला प्रेमसंबंध ठेवण्याबाबत विचारणा केली. त्यावर तरुणीने त्याला नकार दिला. त्याचवेळी त्याने मी जिवाचे बरेवाईट करून घेईन, त्याचा तुला त्रास होईल असे म्हणत ब्लॅकमेल करायला सुरवात केली. पुढे त्याने तरुणीला लग्नाचे आमिष दाखवत मैत्रिणींसोबत राहणारी खोली सोडण्यास भाग पाडले. त्यानंतर दोघेही शहरात एकत्र खोलीत राहण्यासाठी गेले.


नाव बदलून केले शेखर जाधव
खोली भाड्याने  घेताना त्याने स्वत:चे नाव शेखर जाधव असल्याचे सांगितले. याशिवाय दोघेही पती-पत्नी असल्याचे सांगून भाड्याने खोली घेतली. यानंतरही शाकीरने जिवाचे बरेवाईट करण्याची धमकी देत तिच्यासोबत वारंवार शारीरिक संबंध ठेवले. काही दिवसांनंतर तरुणीने त्याच्याकडे लग्नाची मागणी केली. त्यावर त्याने लग्नास नकार दिला. त्यावरून भांडण झाल्याने तरुणी मूळगावी निघून गेली. एक महिन्यानंतर पुन्हा शाकीरने फोन करून अभ्यासाबद्दल सांगत बोलावून घेतले. त्यानंतर एप्रिल २०२० पर्यंत लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहून त्याने लग्नाला नकार दिला. या प्रकरणी शाकीरविरुद्ध अत्याचाराचा गुन्हा नोंद करण्यात आला.

संपादन - गणेश पिटेकर

loading image
go to top