Sambhaji Nagar : छत्रपती संभाजीनगरमध्ये खूनप्रकरणी युवकाला आजीवन कारावास

अडीच वर्षांपूर्वीची घटना : साक्षीदार फितूर मित्रांनाही होणार शिक्षा
jalna
jalnasakal

छत्रपती संभाजीनगर : मित्राच्या पोटात चाकू भोसकून त्याचा खून करणारा आरोपी राज नामदेव जाधव (१९, रा. छत्रपती हॉलजवळ, हर्सूल परिसर) याला आजीवन कारावास आणि दोन हजार रुपयांच्या दंडाची शिक्षा जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. एम. आगरकर यांनी ठोठावली.

श्रीकांत सतीश शिकरे (१९, रा. तुळजाभवानी चौक, हिरानगर, मयूर पार्क, हर्सूल) याने फिर्याद दिली होती. त्यानुसार, आरोपी राज जाधव, यश महेंद्रकर व फिर्यादी हे सर्व मित्र होते. २४ एप्रिल २०२१ला रात्री ९ च्या सुमारास दोघांत भांडण सुरू असताना राजने यशच्या पोटात चाकू भोसकून गंभीर जखमी केले. यशला विशाल भोसले आणि प्रफुल्ल बोरसे यांनी दुचाकीवर खासगी रुग्णालयात दाखल केले.

उपचार सुरु असताना यशचा मृत्यू झाला. हर्सूल पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर तपास अधिकारी तत्कालीन पोलिस निरीक्षक सचिन इंगोले यांनी दोषारोपपत्र दाखल केले होते. तपास अधिकारी आणि वैद्यकीय अधिकाऱ्यांची साक्ष महत्त्वाची ठरली. मृत यश सोमेश महेंद्रकर (रा. एसबीओए शाळेच्या पाठीमागे, हडको) यांच्या आई-वडिलांना फौजदारी दंड संहितेच्या कलम ३५७ (अ) नुसार विधी व सेवा प्राधिकरण यांनी नुकसान भरपाई देण्यासंदर्भात योग्य ती कारवाई करण्याचे आदेश देखील न्यायालयाने दिले आहेत.

फिर्यादीसह आठ साक्षीदार पलटले

खटल्याच्या सुनावणीवेळी २४ साक्षीदार तपासण्यात आले. त्यात फिर्यादीसह मुख्य आठ साक्षीदार फितूर झाले. खटल्यात फौजदारी दंड संहितेच्या कलम ३४० प्रमाणे खोटी साक्ष देणारे आरोपीचे मित्र तथा फिर्यादी श्रीकांत शिखरे, ओंकार कोलते, विशाल भोसले, प्रफुल्ल बोरसे, अमय म्हस्के, अथर्व टाकळकर, पुष्कर भारंबे आणि मित्तल उबाळे यांच्यावर भा. दं. वि कलम १९३ (कमीत कमी ३ वर्षे तर जास्तीत जास्त सात वर्षांची शिक्षा आणि दंडाचे प्रावधान) प्रमाणे कारवाई करण्याचे आदेश देखील न्यायालयाने दिले आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com